Published October 10, 2022 | Version v1
Journal article Open

ग्रंथपालन व्यवसायासाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्ये

  • 1. सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा

Description

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अद्ययावत माहितीला खूप महत्त्व आहे. आजची ग्रंथालये ही माहिती केंद्रात रूपांतरित होत आहेत. प्रत्येक विषयातच संशोधन वाढले आहे, त्यामुळे सूक्ष्म अद्ययावत विचारांची भर  पडत आहे.  त्यामुळे माहिती संकलित, संग्रहित करून ती प्रसारणांचे कार्य करणे खूप जबाबदारीचे झाले आहे. ग्रंथपालनाला सामाजिक दायित्वाची बांधिलकी असलेल्या व्यावसायिकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यानुसार झालेला बदल ग्रंथपालांना स्वीकारणे गरजेचे झाले आहे. ग्रंथपालनाचे क्षेत्र सतत व्यापक होत आहे. त्यामुळे विविध बाजूने विकास होत असून माहिती संप्रेषण  तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या क्षेत्रात आव्हान आणि सुविधाही ही निर्माण झाली आहे.  ग्रंथपालनाच्या व्यापकतेचा, विकासाचा विचार केला तर औद्योगिक ग्रंथपालन व माहिती पद्धती, कृषी ग्रंथपालन, वैद्यकीय ग्रंथपालन इत्यादी नवनवीन शाखा विकसित होत आहेत. ज्ञानाधिष्टित समाज निर्मितीस पुरक कार्य म्हणून माहिती साक्षरतेचा प्रसार ग्रंथालये करत आहेत. वरील सर्व बदलाबरोबरच इंटरनेट व इतर डिजिटल माहिती साधनांच्या सहज उपलब्धतेमुळे प्रत्यक्ष ग्रंथालयातील माहिती साधनांचा वापर कमी होत आहे का याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. तसेच होत असेल तर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रंथालयांनी आपल्या सेवा आणखी सक्षम केल्या पाहिजेत. अर्थात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करीत असताना ग्रंथालयांनी मूलभूत ग्रंथपालनाकडे दुर्लक्ष करता कामा नये. मूलभूत ग्रंथपालन यालाच कदाचित पारंपारिक ग्रंथपालन असेही म्हणता येईल. देव-घेव सेवा, वर्गीकरण, तालिकीकरण,  संदर्भ सेवा या मूलभूत सेवा  आहेत, या सेवा अधिक सक्षम करूनच ग्रंथपालन व्यवसायास स्थिरत्व देता येवू शकेल. यासाठी ग्रंथपालांच्या अंगी आवश्यक अशी कौशल्ये आणि क्षमता असणे आवश्यक आहे. या शोधलेखामध्ये ग्रंथपालांच्याकडे कोणती कौशल्ये व क्षमता असाव्यात याची चर्चा करण्यात आली आहे. संवाद, नेतृत्व आणि सादरीकरण कौशल्ये प्रभावी ग्रंथालय सेवा देण्यासाठी आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्त्रोत बदलतात आणि ग्रंथालये ही माहिती संकलन व वितरणाचा मुख्य आधार आहे.

Files

1001123.pdf

Files (959.1 kB)

Name Size Download all
md5:4fdff69004c287d4a2e30b07acfc6fc8
959.1 kB Preview Download