Published June 30, 2022 | Version v1
Journal article Open

ग्रामीण एकल महिलांची स्थिती : वेल्हे तालुका, जिल्हा पुणे येथील महिलांचा अभ्यास

Description

इथे ‘एकल’ महिला म्हणजे जी नवऱ्याशिवाय एकटी जगते आहे अशी . ती घटस्फोटिता, परित्यक्ता किंवा विधवा स्त्री असू शकते. तिला मूल असेल किंवा नसेल.  त्यातही लेखकांच्या मते ग्रामीण भागातील एकल महिलेची स्थिती हि अजूनच दु:खद असू शकते. तिच्या अन्य शहरी मैत्रिणींपेक्षा तिला जास्ती कष्ट आणि अपेष्टा सोसाव्या लागतातच, शिवाय ती तिच्या कुटुंबातील व्यक्तीसमोरही मोकळेपणाने व्यक्त होऊ शकत नाही, स्वतःच्या अडचणी मांडू शकत नाही.  बऱ्याचदा त्यातील बहुतेकजणी या सरकारला ‘दिसत’ नसतात. ( Visible) जसे कि त्यांचे नाव रेशन कार्डावर नसते. त्यामुळे त्या त्याच्या नातेवाईकांच्या दयेवर अवलंबून राहावे लागते आणि म्हणून त्यांचे फुकटचा नोकर असल्याप्रमाणे शोषण होत राहण्याची शक्यताच अधिक असते.  हे सगळे लक्षात आल्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी बचत गटाचे व्यासपीठ उपलब्ध केले आणि त्यांच्या प्रश्नांवर काम करायला सुरुवात केली.

Files

6. Bageshri Ponkshe.pdf

Files (1.5 MB)

Name Size Download all
md5:a6aaa83e89c1b798eb9a6d88339320f9
1.5 MB Preview Download