विकसित भारत 2047 : भारतीय युवकांची भूमिका व योगदान
Authors/Creators
- 1. सहा.प्राध्यापक, इतिहास विभाग श्रीपतराव चौगुले आर्टस् आणि सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली.
Contributors
Editor:
Description
सारांश
विकसित भारत 2047’ ही संकल्पना भारताला आर्थिकदृष्ट्या समृद्ध, सामाजिकदृष्ट्या सर्वसमावेशक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र बनविण्याचे व्यापक ध्येय आहे. या ध्येयाच्या पूर्ततेमध्ये भारतातील युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रस्तुत संशोधनामध्ये विकसित भारताच्या निर्मितीमध्ये युवकांचे योगदान शिक्षण, कौशल्यविकास, तंत्रज्ञान, संशोधन व नवोपक्रम, उद्योजकता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक सेवा, लोकशाही सहभाग आणि राष्ट्रीय एकात्मता या विविध अंगांनी अभ्यासण्यात आले आहे. भारताची मोठी युवा लोकसंख्या ही देशाची महत्त्वपूर्ण शक्ती असून, योग्य शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास तिचे रूपांतर प्रभावी लोकसंख्यात्मक लाभांशामध्ये करता येते. युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्टार्टअप व उद्योजकता, संशोधन आणि नवोपक्रम यांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शाश्वत विकास, सामाजिक समावेशकता, लोकशाही आणि सुशासन यामध्येही युवकांचे योगदान निर्णायक ठरू शकते. युवकांसमोरील कौशल्यांची कमतरता, रोजगाराच्या संधी आणि वाढती स्पर्धा यांसारख्या आव्हानांवर कौशल्यविकास, संशोधनाला प्रोत्साहन आणि युवा नेतृत्वाला वाव देणे आवश्यक आहे. युवकांना विकासाचे केवळ लाभार्थी न मानता सक्रिय भागीदार आणि सहनिर्माते मानल्यास विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट साध्य करण्यास मोठी मदत होईल.