सदानंद बोरकर यांच्या नाटकातील अंधश्रद्धात्मक जाणीवा
- 1. संशोधक संशोधन केंद्र- सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर
- 2. मार्गदर्शक संशोधन केंद्र- सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर
Contributors
Editor:
Description
सारांश :
सदानंद बोरकर यांचा ‘माझं कुंकू मीच पुसलं !’ हे पहिले नाटक असून या नाटकाची निर्मिती त्यांच्या गावात अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यामुळे एका विज्ञान शिक्षकाचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकूण समाज जागृती करण्यासाठी म्हणून ‘माझं कुंकू मीच पुसलं !’ हे नाटक लिहिले असल्याचे ते प्रस्तावनेत सांगतात. या नाटकामध्ये स्किझोफ्रेनिया झालेल्या व्यक्तीला मानसोपचारतज्ञाकडे घेऊन जाण्या ऐवजी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन एका पुजारीनकडे घेऊन जातात आणि तिच्या दरबारातील खांबाला त्याला उन्हात बांधतात. पाण्याअभावी त्याचा मृत्यू होतो. या सत्यघटनेवर आधारित हा नाटक आहे.
सदानंद बोरकर एकदा टीवीवर बातम्या ऐकतांना वरोरा परिसरातील एक तरुणी हुंड्यासाठी शेत जमीन विकावी लागू नये म्हणून त्याच शेतातील विहिरीमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. या सत्य घटनेवर ‘अस्सा नवरा नको गं बाई’ हे नाटक आधारित आहे. ‘अस्सा नवरा नको गं बाई’ या नाटकातील नायिकेचा लग्न जुडविण्यासाठी कुंडली बघणाऱ्या गुरुजीची मदत घेतो. तेव्हा तो मुलीच्या वडिलांना ग्रह दोष भीती दाखवून कसे लुबाडतो त्याचे वर्णन आले आहे. विदर्भात अनेक ठिकाणी गुप्तधनासाठी गावोगाव भटकणारे लोक आणि प्रसंगी नरबडी देणाऱ्या घटना बघून सदानंद बोरकर यांनी ‘नवरे झाले बावरे’ हे नाटक लिहिलेले आहे, या नाटकामध्ये मध्ये गुप्तधनासाठी स्वतःच्या मुलीचा बडी देणाऱ्या वडिलाची कथा सांगितलेली असून धनाच्या लोभापायी स्वत:च्या मुलीचा विचार न करणाऱ्या व्यक्तीची शोकांतिका सादर केलेली आहे. पती मरण पावल्यानंतर तरुण मुलीच्या वाट्याला सासर आणि माहेर दोन्ही तुटतात तिची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नसतात. तिच्या आयुष्याची होणारी अवहेलना सदानंद बोरकर यांनी ‘हा खेड सावल्यांच्या’ या नाटकामध्ये मांडून समाजात तरुण मुलगी विधवा झाल्यावर तिच्या आयुष्याची अवहेलना नकरता तिला तिच्या निर्णयानुसार चांगले आयुष्य निवडायची संधी दिली पाहिजे असा संदेश देतात.