मानवी भांडवल निर्मितीमध्ये उच्च शिक्षणातील महिलांची भूमिका
Authors/Creators
- 1. (अर्थशास्त्र विभाग), महिलारत्न पुष्पाताई हिरे कला विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय मालेगाव कॅम्प.
Contributors
Editor:
Description
गोषवारा:
मानवी भांडवल (Human Capital) म्हणजे व्यक्तींकडे असलेले ज्ञानकौशल्ये, शिक्षण, आरोग्य आणि अनुभव ज्यांचा उपयोग करून उत्पादकता आणि आर्थिक विकास साधला जातो हे भौतिक भांडवलापेक्षा म्हणजेच यंत्रे इमारती पैशाच्या स्वरूपातील भांडवल यापेक्षा वेगळे असून अमूर्त स्वरूपाचे असते म्हणजेच डोळ्यांना न दिसणारे असे परंतु त्याचा उपयोग झाल्यानंतर त्या मानवी भांडवलाला मूर्त स्वरूप प्राप्त होत असते. याच्यामध्ये मानवाने अंगीकारलेली उत्पादकतेच्या दृष्टीने असलेली सर्व कौशल्य येत असतात. शिक्षण आणि प्रशिक्षणामधील गुंतवणुकीमुळे मानवी भांडवल वाढते जे वैयक्तिक कमाई आणि देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे .उच्च शिक्षण संस्थांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे जो लिंग समानतेच्या दिशेने एक सकारात्मक बदल आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये राबविल्या जाणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी फी माफी आणि इतर सवलतींमुळे उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे आणि याच कारणामुळे कौशल्यविकास आणि ज्ञाननिर्मिती उच्च शिक्षणामुळे महिलांना तांत्रिक, व्यावसायिक आणि संशोधनात्मक कौशल्ये प्राप्त होतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, आयटी, शिक्षण, कायदा इत्यादी क्षेत्रांत महिलांचा वाढता सहभाग देशाच्या एकूण उत्पादकतेत भर घालताना आपणाला दिसून येतो. महिलांचे उच्च शिक्षण ही केवळ वैयक्तिक प्रगती नाहीतर ती एका प्रगतशील समाजाची आणि शाश्वत अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे. आणि याच कारणास्तव उच्च शिक्षणातील झालेल्या प्रगतीमुळे मानवी भांडवल निर्मितीमध्ये महिलांचे भूमिका अत्यंत महत्त्वाची मानवी जाते. प्रस्तुत संशोधन पेपर मानवी भांडवल (Human Capital) वृद्धिंगत करण्यासाठी उच्च शिक्षण घेतलेल्या महिलांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा अभ्यास करतो. उच्च शिक्षणामुळे महिला केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाहीत, तर त्या उत्पादकतेत वाढ, उत्तम आरोग्य आणि सामाजिक-आर्थिक बदलांना गती देतात. व उच्च मानवी भांडवल निर्मिती करतात.