Published April 10, 2026 | Version v1

आधुनिकीकरणाचा भारतीय समाजावर शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक प्रभाव : एक समाजशास्त्रीय विश्लेषण

  • 1. प्रतिष्ठान महाविद्यालय, पैठण, छ. संभाजीनगर
  • 2. डॉ. रफिक झाकरिया महिला महाविद्यालय,नवखंडा, छ.संभाजीनगर.

Description

आधुनिकीकरण ही सामाजिक परिवर्तनाची एक गतिशील प्रक्रिया आहे ज्यामुळे पारंपरिक समाज आधुनिक समाजात रूपांतरित होतो. औद्योगिकीकरण, शहरीकरण, तंत्रज्ञानाचा विकास, शिक्षणाचा प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या घटकांमुळे समाजात व्यापक बदल घडून येतात. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या समाजामध्ये आधुनिकीकरणाचा प्रभाव शिक्षण, अर्थव्यवस्था, राजकारण, धर्म आणि संस्कृती या सर्व क्षेत्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. या संशोधनात्मक लेखामध्ये भारतीय समाजावर आधुनिकीकरणामुळे झालेल्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचे समाजशास्त्रीय विश्लेषण करण्यात आले आहे. या अभ्यासासाठी प्रामुख्याने द्वितीयक माहिती स्रोतांचा वापर करण्यात आला आहे. निष्कर्षानुसार आधुनिकीकरणामुळे शिक्षणाचा प्रसार, आर्थिक विकास, लोकशाही मूल्यांचा विकास आणि सामाजिक समतेची जाणीव वाढली आहे; तथापि पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांमध्ये काही प्रमाणात परिवर्तन देखील झाले आहे.

Files

073241.pdf

Files (522.6 kB)

Name Size
md5:efdad0d6b8d444ad175446ca6f8924a6
522.6 kB Preview Download