पोषणशास्त्र व किशोरवयीन मुलींच्या आहाराचा अभ्यास
Authors/Creators
- 1. गृहशास्त्र विभागप्रमुख, कला वरिष्ट महाविद्यालय, सावंगी, छत्रपती संभाजीनगर.
Contributors
Editor:
Description
सारांश –
पोषणशास्त्र व किशोरवयीन मुलींच्या आहाराचा अभ्यास या विषयावरील केलेल्या संशोधनाद्वारे असे आढळून आले की, पोषणशास्त्राबद्दल किशोरवयीन मुली जागृत नाहीत. त्यांच्या आहारामध्ये फळे, भाज्या, दूध व दुधाचे पदार्थ, कठीण कवचाची फळे आणि मोड आलेली कडधान्य यांचा योग्य प्रमाणात नियमित समावेश केला जात नाही. त्यामुळे त्यांचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्यांच्यामध्ये निरुत्साह, अभ्यासाचा ताण, नैराश्य, त्वचेचे तेज कमी होणे, केस गळणे, अशक्तपणा आणि थकवा, लोहाची कमतरता, धाप लागणे, सर्दी, खोकला किंवा ताप, कमी एकाग्रता, न्यूनगंड आणि मूडमध्ये बदल होणे अशी लक्षणे आढळले. अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे व जंक फूडच्या अतिसेवनाने लठ्ठपणा किंवा अशक्तपणा अशा समस्या आढळून आल्या. किशोरवयीन मुलींनी वैयक्तिक स्वच्छतेकडे आणि आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पण त्या टीव्ही, मोबाईल आणि फास्ट फूडचा वापर जास्त करताना दिसून आले. समतोल आहार आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे असे आढळून आले. त्यामुळे मुलींनी समतोल आहार घेतला तर पोषण योग्य प्रकारे होऊन त्यांचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील. आणि आरोग्य विषयक समस्या कमी होण्यास मदत होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ, योगासने आणि नियमित व्यायाम करावा. पालकांनी मुलींशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. तसेच प्रसारमाध्यमाच्या सहाय्याने पोषणशास्त्र, समतोल आहार व आरोग्याबद्दल जनजागृती करणे खूप आवश्यक आहे.