Published May 23, 2026 | Version v1

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सामाजिक सेवा क्षेत्रातील खर्चाचा सर्वसामान्यांवर होणारा परिणाम

Description

सारांश:

प्रस्तुत शोधनिबंध पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक सेवांच्या परिणामकारकतेचा आणि व्याप्तीचा आढावा घेतो. औद्योगिक शहर म्हणून वेगाने विकसित होत असताना शहरीकरणाचा वाढता वेग आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. विकासाबरोबर शहरातील सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत सामाजिक कल्याणाचे लाभ पोहोचवणे हे एक मोठे आव्हान आहे. या शोधनिबंधात प्रामुख्याने आरोग्य सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि गरिबी निर्मूलन योजनांचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. प्राथमिक आणि दुय्यम माहितीच्या आधारे हा अभ्यास सामाजिक सेवा वितरणातील अडचणी शोधतो आणि महानगरपालिकेच्या योजना अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सुधारणात्मक उपाय सुचवण्याचा प्रयत्न करतो. पिंपरी-चिंचवडमधील शहरी गरिबांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने हा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. संशोधनामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सामाजिक सेवांवरील खर्चाचा नागरिकांना झालेल्या लाभाचा आढावा घेणे हा आहे. या संशोधनासाठी प्रामुख्याने प्राथमिक माहितीचा वापर करण्यात आला असून यामध्ये प्रश्नावली तयार करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ५५८ नागरिकांकडून ही प्रश्नावली भरून त्यांना महानगरपालिकेकडून मिळालेल्या सामाजिक सेवा सुविधांच्या परीणामकारकतेचा आढावा घेण्यात आलेला आहे.  शेवटी, सामाजिक सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी उपाययोजनांची शिफारस या शोधनिबंधात करण्यात आलेल्या आहे.         

मुख्य शब्द: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, सामाजिक सेवा खर्च, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन.

Files

JAMRSD 05-S02(A)-2026_126.pdf

Files (1.1 MB)

Name Size
md5:1aa132b158e8d1257878959981417cb6
1.1 MB Preview Download

Additional details

Software

Repository URL
https://ijamrsd.com/