Published March 29, 2026 | Version v1

शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून जामखेड तालुक्यातील वाढते अपारंपारिक नूतनीकरणक्षम सौर व पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्र

  • 1. सहा. प्राध्यापक व विभागप्रमुख, श्री संत गजानन महाविद्यालय, खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर

Description

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या पठारी आणि कमी पर्जन्यमानाचा भाग आहे तालुक्याच्या कांही भागात सह्याद्रीच्या बालाघाट पर्वतरांगा सुध्दा पसरलेल्या आहेत. त्यामुळे या भागात वर्षभर मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने व वाऱ्याची दिशा व वेग पवन उर्जेस पोषक असल्याने या भागात नूतनीकरणक्षम सौर्य व पवन ऊर्जा निर्मितीस मोठा वाव आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीने ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणाचे रक्षण या बाबी विचारात घेवून या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सौर्य व पवन ऊर्जा निर्मिती केली जात आहे त्यामुळे प्रस्तुत शोधनिबंधात जामखेड तालुक्यातील सौर आणि पवन ऊर्जेच्या वाढत्या विस्ताराचा व त्याच्या क्षमतेचा अभ्यास करण्यात आलेला आहे.

तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती विशेषतः डोंगररांगा आणि वर्षभर मिळणारा प्रखर सूर्यप्रकाश यामुळे हे क्षेत्र अक्षय ऊर्जेसाठी नंदनवन ठरत आहे. या निबंधात तालुक्यातील ऊर्जेच्या सद्यस्थितीचे विश्लेषण केले असून, पारंपरिक ऊर्जा स्रोतांकडून हरित ऊर्जेकडे होणाऱ्या संक्रमणाचा आढावा घेतला आहे. संशोधनातून असे दिसून येते की, खर्डा आणि लगतच्या डोंगराळ भागात पवनचक्क्यांचे जाळे विस्तारले असून, सपाट माळरानावर सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होत आहे. येथील सौर आणि पवन ऊर्जेची वाढती क्षमता शाश्वत विकासाच्या दृष्टीने क्रांतिकारी आहे यामुळे स्थानिक रोजगार, शेतीसाठी दिवसा वीज उपलब्धता आणि कार्बन उत्सर्जनात घट असे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

Files

52. शिवानंद तानाजीराव जाधव.pdf

Files (339.9 kB)

Additional details

References

  • 1. एन.एस.राठोड, एन.एल.पवार (२०१०), "नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत" हिमांशू पब्लिकेशन. 2. डॉ. विजय पांढरीपांडे (२०१०), "अक्षय ऊर्जा आणि भारत", मेहता पब्लिशिंग हाऊस 3. सुरेंद्र काळबांडे, सारिका पोंगडे (२०१६), "हरित ऊर्जा निर्मितीकरीता अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत", युनिव्हर्सल प्रकाशन पुणे. 4. डॉ. स.ह.सेंगर (), "अपारंपारिक ऊर्जा साधने", गोंडवा कृषी प्रकाशन, 5. संयुक्त राष्ट्र संघ (२०१५), 'Sustainable Development Goals 2030' - संयुक्त राष्ट्र संघ. 6. महाऊर्जा (२०२४), महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) वार्षिक अहवाल २०२३-२४ 7. mahadesh.maharashtra (जिल्ह्या सामाजिक व आर्थिक समालोचन, अहमदनगर जिल्हा), २०२४ 8. https://www.mahaurja.maharashtra.gov.in/https://marathi.economictimes.com/business-news/tata-power-renewable-energy-to-set-up-12-5-mw-captive-solar-plant-in-maharashtra/articleshow/104485197.cms