गणेश विवाहाची लोकपरंपरा : पिरकोन गावाचा ऐतिहासिक अभ्यास
Authors/Creators
- 1. Assistant Teacher, Royal Shikshan Sanstha Modern School and Jr. College Vashi, Navi Mumbai
Contributors
Editor:
Description
सारांश
“गणेश विवाहाची लोकपरंपरा: पिरकोन गावाचा ऐतिहासिक अभ्यास” या लेखात रायगड जिल्ह्यातील पिरकोन गावातील गणेश विवाह उत्सवाची लोकसांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे. इतिहासाचा अभ्यास केवळ राजकीय घटनांपुरता मर्यादित नसून लोकपरंपरा आणि धार्मिक श्रद्धांशीही निगडित असतो, हे प्रस्तावनेत मांडले आहे.पिरकोन गावात फाल्गुन शुद्ध दशमी व एकादशीला गणेशाचा प्रतीकात्मक विवाह साजरा केला जातो. या परंपरेमागे पुराणकालीन कथा (शिवपुराणातील गणेश-विवाह), तसेच स्थानिक श्रद्धा यांचा संगम आहे. गावाचा इतिहास वीरगळ, ताम्रपट (इ.स. ११२०) आणि देवळांच्या अवशेषांमधून समोर येतो, ज्यातून पिरकोनची प्राचीनता आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित होते.संशोधनात गुणात्मक पद्धती वापरून मंदिर, ताम्रपट, लोकसाक्षी, आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांच्या आधारे माहिती संकलित केली आहे. गणेश विवाह उत्सवात हळद, मुहूर्त, मंगलाष्टक अशा मानवी विवाहासारख्या विधींचा समावेश असून, रिद्धी-सिद्धी यांच्याशी गणेशाचा विवाह कल्पिला जातो. पिरकोनमधील परंपरा ही लोकधर्म, सामाजिक ऐक्य आणि ऐतिहासिक सातत्य यांचा संगम दर्शवते. निष्कर्षतः, ही परंपरा पुराणकथा आणि लोकजीवन यांच्यातील सांस्कृतिक संक्रमणाचे जिवंत उदाहरण असून, स्थानिक इतिहास जतन करण्यासाठी महत्त्वाची आहे.