महाराष्ट्रातील किल्ल्यांचे संवर्धन
Description
महाराष्ट्राच्या अभिमानाचे आणि स्वाभिमानाचे एक प्रतीक म्हणजे महाराष्ट्रातील किल्ले होय. शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले हे किल्ले महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण करून देतात. त्याचबरोबर महाराष्ट्रावर राज्य केलेल्या विविध राजवटींच्या न्याय - अन्यायाची आठवणही करून देतात. औरंगजेबाच्या आक्रमणाच्या झंजावातात आदिलशाही, कुतुबशाही या बलाढ्य सत्ताही पराभूत झाल्या. शिवरायांच्या स्वराज्याने मात्र औरंगजेबाला अखेरपर्यंत झुंजवले ते या किल्ल्यांच्या आधारानेच ! या किल्ल्यांची निर्मिती, त्यांचे बांधकामही अचंभीत करणारी आहे. काळाच्या ओघात या किल्ल्यांचे महत्त्व कमी होत गेले. युद्ध तंत्र बदलत गेले. विशेषत: एकोणिसाव्या शतकापासून किल्ल्यांचा वापर कमी होत गेला. ब्रिटिश काळात त्यांच्या राजकीय नीतीमुळे बहुतांशी किल्ल्यांना भग्नावस्था प्राप्त झाली. या किल्ल्यांचे संवर्धन ही काळाची आणि महाराष्ट्राचीही खूप मोठी गरज आहे.