Published April 20, 2026 | Version v1

ग्रँट डफचा मराठा इतिहासलेखनाविषयीचा वाद आणि अ. रा. कुलकर्णी

  • 1. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

Description

ब्रिटीशकाळात म्हणजेच १९ व्या शतकात भारतात अनेक ब्रिटीश इतिहासकारांनी इतिहासलेखन केले. ज्याप्रमाणे माल्कमने मध्य हिंदुस्थानचा, कर्नल जेम्स टॉडने रजपुतांचा अथवा राजस्थानचा इतिहास (१८२९), सर विल्यम हंटर ने ग्रामीण बंगालचा इतिहास (१८६८), डब्ल्यू. एच. मोरलँडने संयुक्त प्रांताचा इतिहास (१९०४ व १९११), विल्क्सने म्हैसूरचा इतिहास, फोबर्सने गुजरातचा इतिहास लिहिला तसाच ग्रँट डफने मराठयांचा इतिहास लिहिला.   

ग्रँट डफने लिहिलेला (History of the Mahrattas) हा ग्रंथ म्हणजे मराठी इतिहासावर लिहिला गेलेला, कालक्रमानुसार असलेला पहिलाच सर्वसमावेशक ग्रंथ आहे. म्हणून त्याला मराठा इतिहासाच्या पहिला इतिहासग्रंथाचा लेखक म्हणून ही मान दिला जातो. याआधी मराठयांच्या इतिहासावर एम. सी. स्प्रेंगेल (१७८४/१७९१) आणि स्कॉट वेअरिंग (१८१०) यांनी लेखन केलेले दिसून येते.

Files

072114.pdf

Files (644.7 kB)

Name Size
md5:52b65136a5afaa9887d90bde6ca1d1e6
644.7 kB Preview Download