Published April 18, 2026 | Version v1

भावनिक बुद्धिमत्ता व सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या मोफत योजनांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम- विशेष संदर्भ लाडकी बहिण योजना

  • 1. सौ.सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतमनगर, ता.- कोपरगाव, जि.-अहिल्यानगर (महाराष्ट्र)

Description

 भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence – EI) म्हणजे आपल्या स्वत:च्या भावना ओळखणे, समजून घेणे, आणि त्याचे व्यवस्थापन करणे, तसेच इतरांच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्याशी सहानभूती (Empathy) दर्शवणे होय.” राजकारण आणि आर्थिक सत्ता हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले असून भावनिक बुद्धिमत्ता ही दोन्हीमध्ये महत्वाची भूमिका बजावते. भारतात स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास, आर्थिक समानता सामाजिक न्याय निर्माण करण्यासाठी सरकारकडून कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे. आज केंद्र सरकार घटक राज्यातील विविध ५६ मंत्रालयांकडून ३२८ कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे. कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सत्तेवर असलेले राजकीय पक्ष देशातील मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमै खाउंगा, किसीको खाने दुंगाया घोषणेतून राजकीय सत्ता प्राप्त केली. याच दरम्यान २०१३ मध्ये सुरु करण्यात आलेल्याथेट खात्यात लाभ (DBT)’ या योजनेच्या मदतीने कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही मोफत योजनांचा लाभ लाभार्थ्याच्या खात्यात पाठविला जात आहे. यातूनचरेवडी संस्कृतीनिर्माण झाली आहे. मोफत योजनांमुळे एका बाजूला देशात सामाजिक विकास न्याय, आर्थिक समानता साधली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला या योजनांमुळे लोकांची काम करण्याची वृत्ती देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत आहे. प्रस्तुत शोध निबंधात मोफत योजनांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

Files

072449.pdf

Files (624.6 kB)

Name Size Download all
md5:9fb3099556ca9ef57c36cb2efee0d007
624.6 kB Preview Download