Published March 24, 2026 | Version v1

माझी कन्या भाग्यश्री योजना एक सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास

  • 1. संगमनेर नगरपालिका कला दा. ज मालपाणी वाणिज्य आणि ब. ना सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) संगमनेर.

Description

भारतात मुलींच्या जन्माकडे पारंपारिक दृ‌ष्टिकोनातून अनेकदा उपेक्षेने पाहिले जाते. सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक कारणांमुळे मुलींविषयी भेदभाव कन्याभ्रूण हत्या, मुलींचे शिक्षण थांबविणे, लवकर लग्न लावणे, अशा अनेक समस्या आजही समाजात आढळतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांचे शिक्षण व संगोपन यांना आर्थिक आधार देणे आणि स्त्री भ्रूण हत्या रोखणे या उद्देशाने माझी कन्या भाग्यश्री योजना ही महत्वकांक्षी योजना राबवण्यास सुरुवात केली.

        ही योजना मुलीला जन्मा पासून ते अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत आर्थिक संरक्षण देण्या सोबतच मुलीच्या जन्माबद्दल समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यावर भर देते. योजना राबविताना मुलीच्या पालकांना कुटुंब नियोजनाचे पालन करणे, दोनच आपत्य असणे आणि मुलीचा विवाह अठरा वर्षांपूर्वी न लावणे अशा अटी घालण्यात आल्या या अटींमुळे जनसंख्येवर नियंत्रण ठेवणे आणि मुलींचे सशक्तिकरण हे दोन्ही उद्देश साध्य होतात. या अभ्यासातून माझी कन्या भाग्यश्री योजना समाजात कितपत प्रभावी ठरली आहे. लोकांचा प्रतिसाद कसा आहे मुलींच्या जन्मदरावर, शिक्षणावर आणि सामाजिक मानसिकतेवर या योजनेचा काय परिणाम झाला आहे. याचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. या योजनेमुळे महिलांविषयी विचारसरणी आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया समजून घेणे हा या अभ्यासाचा मूलभूत पैलू आहे.

Files

071817.pdf

Files (636.4 kB)

Name Size Download all
md5:20f04c0956e076c80e5d3e5f331f3e41
636.4 kB Preview Download