Published March 24, 2026 | Version v1

ग्रामीण महिलांची आर्थिक साक्षरता व शासकीय योजनांबाबतची जागरूकता : एक अभ्यास

  • 1. कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य, ब.ना. सारडा विज्ञान महाविद्यालय, संगमनेर

Description

 ग्रामीण महिलांची आर्थिक साक्षरता ही त्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी, कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी तसेच समावेशक आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. महिला केवळ कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळत नाहीत, तर त्या उत्पादन, बचत, उपभोग आणि गुंतवणूक यांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतात. भारत सरकारने महिलांच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षेसाठी विविध शासकीय योजना राबविल्या असल्या तरी ग्रामीण भागातील महिलांपर्यंत या योजनांची माहिती, समज आणि प्रत्यक्ष लाभ कितपत पोहोचतो, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात.

प्रस्तुत संशोधनात ग्रामीण महिलांची आर्थिक साक्षरतेची सद्यस्थिती, त्यामागील सामाजिक-आर्थिक कारणे, आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्यास होणारे परिणाम तसेच शासकीय योजनांमधून मिळणाऱ्या प्रत्यक्ष फायद्यांचा मागोवा घेण्यात आला आहे. या अभ्यासासाठी वर्णनात्मक व विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. प्राथमिक माहिती प्रश्नावली व प्रत्यक्ष संवादाद्वारे गोळा करण्यात आली असून दुय्यम माहिती UNDP, RBI, आर्थिक सर्वेक्षण, शासकीय अहवाल व संशोधन नियतकालिकांमधून संकलित करण्यात आली आहे.

संशोधनातून असे दिसून येते की ग्रामीण महिलांमध्ये बचत व काही योजनांची प्राथमिक माहिती असली तरी विमा, डिजिटल आर्थिक व्यवहार, कर्ज व्यवस्थापन आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाबाबत जागरूकता तुलनेने कमी आहे. शिक्षण पातळी, बचत गट सदस्यत्व व प्रशिक्षण यांचा आर्थिक साक्षरतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.  

Files

071801.pdf

Files (624.9 kB)

Name Size Download all
md5:8e11e401eada0c87a0149b5413210919
624.9 kB Preview Download