नवे उच्च शिक्षण धोरण आणि मराठी भाषा
Authors/Creators
- 1. श्रीमती चपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय,सांगली
Contributors
Editor:
Description
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे भारताच्या शिक्षण व्यवस्थेत मूलभूत परिवर्तन घडवून आणणारे धोरण असून बहुविषयक शिक्षण, मातृभाषेचा वापर, संशोधनवृद्धी आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण यावर विशेष भर देण्यात आला आहे. या धोरणामुळे मराठीसारख्या प्रादेशिक भाषांना उच्च शिक्षणात नवे स्थान मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. मातृभाषेतून अध्यापन केल्याने विद्यार्थ्यांचे आकलन वाढते, ग्रामीण व वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होते आणि शिक्षणातील समावेशकता वाढते. अभ्यासक्रमातील लवचिकता, अकादमिक क्रेडिट बँक, शिक्षक प्रशिक्षण, डिजिटल साधने आणि संशोधनाभिमुख दृष्टीकोन यांमुळे मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून विकसित होण्याची क्षमता प्राप्त करते. तसेच प्रशासन, अनुवाद, माध्यमे, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रांत मराठी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीही वाढू शकतात. त्यामुळे नवे उच्च शिक्षण धोरण मराठी भाषा, संस्कृती आणि ज्ञाननिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरते.
Files
180131.pdf
Files
(793.4 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:1de35a3b304b976bd743746f3b90343b
|
793.4 kB | Preview Download |