Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

भारतीय राजकारणातील प्रादेशिक पक्षांचा उदय: एक विश्लेषणात्मक अभ्यास

  • 1. संशोधक, राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

Contributors

Description

भारतीय राजकारण 'एक पक्ष वर्चस्वा'कडून 'बहुपक्षीय पद्धती'च्या दिशेने प्रवास करत आहे. या महत्वपूर्ण बदलाला प्रादेशिक पक्षांचा उदय कारणीभूत आहे. त्यामुळे प्रस्तुत शोधनिबंधात भारतीय राजकारणातील प्रादेशिक पक्षांच्या उदयाचा ऐतिहासिक आढावा घेण्यात आला आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सर्वसमावेशक भूमिका आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील तिचे निर्विवाद वर्चस्व यांचा विचार करून, प्रामुख्याने पंडित नेहरूंच्या काळातील कृषी धोरण आणि जमीन सुधारणा कायद्यांमुळे ग्रामीण भागातील 'सधन शेतकरी वर्गात' निर्माण झालेली अस्वस्थता, हे प्रादेशिक पक्षांच्या उदयाचे प्रमुख कारण कसे ठरले, याचे विश्लेषण यात मांडले आहे. तसेच १९६९ चे काँग्रेस विभाजन, जनता दलाचे अपयश, मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे निर्माण झालेले जातीय ध्रुवीकरण आणि विविध घटक राज्यांतील भाषिक व सांस्कृतिक अस्मितेमुळे प्रादेशिक पक्षांच्या वाढीने घेतलेला वेग, याचा प्रस्तुत शोधनिबंधात सविस्तर आढावा घेतला आहे.

 

Files

180128.pdf

Files (902.0 kB)

Name Size Download all
md5:1e416b2936a28e48e82837dba24ec50b
902.0 kB Preview Download