Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

भारतातील सेवा क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा होणारा परिणाम

  • 1. अर्थशास्त्र विभाग, नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सांगली
  • 2. सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेज ऑफ, आर्ट्स अँड कॉमर्स सांगली

Contributors

Description

        कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानातील वेगवान प्रगतीमुळे भारतीय सेवा क्षेत्रात मूलभूत परिवर्तन घडून येत आहे. त्यासोबतच ग्राहक सेवा, कार्यक्षमता वाढ आणि वैयक्तिकृत सेवा पुरवठा या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता चा वापर लक्षणीयरीत्या वाढलेला दिसून येत आहे. हा समीक्षा लेख भारतीय सेवा क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ताच्या प्रभावाचे विश्लेषण करतो, विशेषतः माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, रोजगारातील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका, शिक्षण क्षेत्रावरचा परिणाम तसेच चॅटबॉट्स, मशीन लर्निंग, ग्राहक, रोबोटिक्स यांसारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. या अभ्यासातून असे दिसून येते की कृत्रिम बुद्धिमत्ता मुळे सेवा पुरवठ्याची गती, अचूकता आणि ग्राहक समाधानामध्ये सुधारणा झाली आहे. मात्र, त्याचबरोबर नैतिक मुद्दे, माहिती गोपनीयता, शिक्षणाची गुणवत्ता, माहितीची गुणवत्ता, सायबर सुरक्षा, अल्गोरिदमिक पक्षपात, नियामक चौकटींचा अभाव, तंत्रज्ञानातील असमान प्रवेश आणि रोजगारावर होणारा संभाव्य परिणाम ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरातील प्रमुख आव्हाने आहेत. योग्य धोरणे व नियमावली नसल्यास आर्थिक विषमता वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या संशोधन साहित्याचा व उद्योगातील प्रकरण अभ्यासांचा आढावा घेऊन, हा लेख कृत्रिम बुद्धिमत्ता च्या युगातील भारतीय सेवा क्षेत्रातील बदलती रचना व त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणामांचा अभ्यास करतो.

 

Files

180107.pdf

Files (957.9 kB)

Name Size Download all
md5:03271cc97de579c7c5f73467d100efa4
957.9 kB Preview Download