Published March 11, 2026 | Version v1

ईव्हीएम (EVM) मशीन आणि विश्वासार्हता

  • 1. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई.

Description

जगामध्ये पहिल्यांदा इंग्लंड या देशांमध्ये लोकशाही अस्तित्वात आली. इंग्लिश मध्ये शेतमालावर सरकारने अतिरिक्त कर आकारला होता त्या विरोधामध्ये मोठे आंदोलन झाले आणि सरकारला आपला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले हे लोकशाही पद्धतीने यशस्वी झालेले पहिले आंदोलन होते.लोकशाही पद्धतीने तेथील सरकार निर्णय घेऊ लागले व प्रशासन चालू लागले. त्यामुळेच इंग्लंडला 'लोकशाहीची जननी '(Mother of Democracy )असे म्हटले जाते. औद्योगिक क्रांतीच्या नंतर कच्च्या मालाचे पक्या मला मध्ये अतिशय जलद गतीने उत्पादन होऊ लागले. सर्वच क्षेत्रामध्ये उत्पादन जलद गतीने वाढले त्यामुळे या उत्पादित वस्तू विक्री करण्यासाठी व आपला व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी पाश्चिमात्य जगतातील अनेक देश मोठ्या बाजारपेठांच्या शोधासाठी आशिया व आफ्रिका खंडामध्ये आली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यामध्ये सर्वाधिक आघाडीवर होती. सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीने केवळ आपला व्यापार वाढविणे आणि आर्थिक नफा कमविणे या बाबींवर आपले अधिक लक्ष केंद्रित केले. परंतु रॉबर्ट क्लाइव्ह या गव्हर्नर जनरल ने पहिल्यांदा अशा प्रकारची महत्त्वकांक्षा व्यक्त केली की, आपण भारतामध्ये राजकीय सत्ता देखील स्थापन करू शकतो आणि अशा प्रकारच्या संधीच्या शोधात कंपनी होती. इसवी सन 1757 च्या प्लासीच्या लढाईच्या माध्यमातून त्यांना अशा प्रकारची संधी चालून आली आणि पहिल्यांदा सिराज उद्दोला या बंगालच्या नवाबाचा पराभव करून  बंगाल प्रांत कंपनीने आपल्या ताब्यामध्ये घेतला. त्यानंतर मध्य प्रांत,पंजाब, दक्षिण प्रांत अशाप्रकारे अनेक भाग कंपनीने आपल्या नियंत्रणाखाली घेतले.

Files

_104.pdf

Files (524.2 kB)

Name Size
md5:14d28ade4aa1efacb40e3211f5189fb5
524.2 kB Preview Download