Published March 11, 2026 | Version v1
Journal article Open

निवडणूक प्रक्रियेत माध्यमे व सामाजिक माध्यमांची भूमिका

  • 1. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड.

Description

लोकशाहीमध्ये माध्यमांना चौथ्या स्तंभाचे असे महत्वपूर्ण स्थान प्राप्त आहे. माध्यमे माहितीचा प्रसार, विचार-विमर्श आणि जनमत निर्मितीची मुख्य साधने आहेत. भारतीय गणराज्यातील निवडणुकांचे स्वरूपही माध्यमांच्या वापरामुळे सतत बदलत आले आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रसारमाध्यमांनी जनतेला मतदान प्रक्रियेबद्दल जागरूक करून महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळातील साक्षरतेचा दर कमी होता, त्यामुळे गावोगावी प्रचारसभांद्वारे प्रश्न मांडण्याव्यतिरिक्त रेडिओसारख्या साधनांनाही जागरूकतेसाठी वापरले गेले. या काळापासून आजपर्यंत छापील वर्तमानपत्र, रेडिओ-टीव्ही व डिजिटल माध्यमे यांचा निवडणूक प्रचारात व जनजागृतीत महत्वाचा वाटा आहे. निवडणूक ही लोकशाहीचे मूलभूत स्तंभ असून नागरिकांना आपली मते व्यक्त करून स्वत: सरकार निवडण्याची संधी देते. भारतात निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, स्वातंत्रिक आणि लोकनिर्देशित राहावी यासाठी विविध नियमावली अस्तित्वात आहेत. माध्यमांनी या प्रक्रियेत नागरिकांचे मत जागृत करण्याचे आणि मतदानाला अर्थपूर्ण बनवण्याचे कार्य केले आहे. माध्यमे केवळ माहितीचे वाहक राहिले नाहीत तर जनमत घडविणारे, मतदार जागृत करणारे, प्रचाराचे प्रमुख साधन आणि कधीकधी विवादाचे केंद्रही बनले आहेत. पारंपरिक माध्यमे (वृत्तपत्रे, दूरदर्शन, रेडिओ) आणि डिजिटल समाज माध्यमे (फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, एक्स, व्हॉट्सॲप) यांचा एकत्रित प्रभाव निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे उमेदवार निवड, प्रचार, मतदान आणि निकाल यासर्वांवर  दिसून येतो.

Files

_57.pdf

Files (568.2 kB)

Name Size Download all
md5:5316620c793e6ae86b746076dc97a4bb
568.2 kB Preview Download