Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

महाराष्ट्रातील होमस्टे संस्कृती: ग्रामीण महिला सक्षमीकरण– एक चिकित्सक अभ्यास.

  • 1. अर्थशास्त्र विभाग, सहाय्यक प्राध्यापक, न्यू कॉलेज, कोल्हापूर

Description

सारांश

प्रस्तुत संशोधन लेखामध्ये महाराष्ट्रातील होम-स्टे संस्कृतीचा ग्रामीण महिला सक्षमीकरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. पर्यटन क्षेत्रात होत असलेल्या बदलांमुळे पर्यटक स्थानिक संस्कृती, जीवनशैली आणि पारंपरिक अनुभवांचा शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात होम-स्टे ही संकल्पना वेगाने विकसित होत असून ती ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे स्वरूप देत आहे. होम-स्टे व्यवसायामध्ये ग्रामीण महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. त्यांच्या पाहुणचार कौशल्य, पाककला आणि व्यवस्थापन क्षमतेच्या आधारे त्या या व्यवसायाचे यशस्वीपणे संचालन करत आहेत.या अभ्यासामध्ये दुय्यम स्रोतांचा वापर करून होम-स्टे संस्कृतीचे स्वरूप, ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्थितीवर होणारे परिणाम तसेच महिला सक्षमीकरणातील त्याची भूमिका यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. होम-स्टेमुळे महिलांना घरबसल्या उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत असून त्यांच्यात उद्योजकता, आर्थिक स्वावलंबन आणि कौटुंबिक निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढताना दिसून येतो. तसेच पर्यटकांशी संवाद साधताना महिलांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेतही वाढ होत आहे.तथापि, भाषिक अडथळे, प्रशिक्षणाचा अभाव, विपणनातील अडचणी आणि सुरक्षेचे प्रश्न ही काही आव्हाने देखील दिसून येतात. योग्य प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य आणि शासकीय पाठबळ मिळाल्यास होम-स्टे हा ग्रामीण महिला सक्षमीकरणाचा आणि ग्रामीण विकासाचा प्रभावी व शाश्वत मार्ग ठरू शकतो. महाराष्ट्रातील होमस्टे संस्कृती

 

Files

x180164.pdf

Files (653.5 kB)

Name Size Download all
md5:9edf7e35f1a460e81217a23a764707e9
653.5 kB Preview Download