Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

मराठी साहित्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

  • 1. संशोधक विद्यार्थी, कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी, रा.गारगोटी ता.भुदरगड जि. कोल्हापूर

Description

शोधसार

एकविसाव्या शतकात आपण पाहतो की तंत्रज्ञानाचा प्रभाव हा मानवाच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवत आहे. हा जो बदल होत आहे या बदलांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AI चा महत्त्वाचा वाटा असल्याचे दिसून येते. खूप व्यापक प्रमाणात याची संकल्पना संपूर्ण जगभरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्र, विभागांमध्ये उपयोगात आणलेली दिसते. अशा या कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी सांगायचे झाले तर मानवानेच यंत्राच्या साह्याने निर्माण केलेली बुद्धिमत्ता होय. Artificial Intelligent AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय, हा याचा सरळ भाषांतरित अर्थ आहे. AI चा काही वेळेला चांगला परिणाम होतो तर काही वेळेला त्याचा विपरीत परिणाम होतो. AI तंत्रज्ञानामुळे मानवाला रोजगाराच्या संधी अनेक क्षेत्रात निर्माण झाल्या व काही क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी कमी झाल्या. मराठी साहित्य, समाज, संस्कृती ही क्षेत्रे ही त्याला अपवाद राहिलेली नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या आधुनिक तंत्रज्ञानामुळे तर मराठी साहित्य संशोधनाला आज एक नवे परिमाण प्राप्त झाले आहे. मराठी साहित्यात आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे.त्यामुळे अनेक संधी आणि आव्हाने ही निर्माण होत आहेत. असे जरी असले तरी मराठी साहित्य क्षेत्रासाठी हे तंत्रज्ञान अधिक सुलभ परिणामकारक ठरत आहे. तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय त्याच्या व्याख्या, स्वरूप, संकल्पना तसेच मराठी साहित्य आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा परस्पर संबंध, मराठी साहित्याशी संबंधित कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनुप्रयोग इत्यादी गोष्टींचा प्रस्तुत शोधनिबंधात अभ्यास केला आहे.

  

Files

x180154.pdf

Files (589.6 kB)

Name Size Download all
md5:5318c0149a0e8612620f4e89840dd582
589.6 kB Preview Download