Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

निवडणुकीचे बदलते स्वरूप : ई-वोटिंगच्या विश्वातील संधी आणि आव्हाने

  • 1. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात, गगनबावडा, ता.गगनबावडा जि.कोल्हापूर

Description

सारांश :

‘निवडणुकीचे बदलते स्वरूप: ई-वोटिंगच्या विश्वातील संधी आणि आव्हाने’ या लेखात पारंपारिक मतदान पद्धतीपासून ई-वोटिंगकडे होत असलेल्या संक्रमणाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या निवडणूक प्रक्रियेत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मोठे बदल घडत आहेत. ई-वोटिंग ही केवळ ईव्हीएमपुरती मर्यादित नसून इंटरनेट, ब्लॉकचेन, बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि डिजिटल माध्यमांद्वारे रिमोट मतदानाची संकल्पना यामध्ये समाविष्ट आहे. लेखात ई-वोटिंगचे दोन प्रकार स्पष्ट केले आहेत—ऑफलाइन (EVM आधारित) आणि ऑनलाइन/रिमोट ई-वोटिंग. स्थलांतरित मतदार, दिव्यांग व वृद्ध नागरिक, तसेच तरुण पिढी यांना सुलभ मतदानाची सुविधा उपलब्ध करून देणे, मतदानाची टक्केवारी वाढवणे, निवडणूक खर्चात बचत, पारदर्शकता आणि तातडीचे निकाल ही ई-वोटिंगची महत्त्वाची फायदे म्हणून अधोरेखित केली आहेत. तथापि, सायबर हल्ल्यांचा धोका, हॅकिंग, मतदाराची गोपनीयता, डिजिटल दरी, तांत्रिक साक्षरतेचा अभाव, पडताळणीची अडचण, ओळख चोरी आणि सॉफ्टवेअर त्रुटी ही गंभीर आव्हाने लेखात मांडली आहेत. ‘एंड-टू-एंड एनक्रिप्शन’, ‘मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ आणि ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षेची पातळी वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. एकूणच, ई-वोटिंग हे भविष्यातील लोकशाहीचे प्रभावी साधन ठरू शकते; मात्र तंत्रज्ञानाबरोबरच कडक सुरक्षा व्यवस्था, कायदेशीर चौकट आणि मतदारांचा विश्वास संपादन करणे अत्यावश्यक आहे, असा निष्कर्ष लेखात मांडलेला आहे.

 

Files

x180144.pdf

Files (634.2 kB)

Name Size Download all
md5:8b8068f8c744ea3310335b25c47ae1fa
634.2 kB Preview Download