Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

ताणतणाव कमी करण्यासाठी आधुनिक दृष्टिकोनातून खेळाचे महत्व

  • 1. शारीरिक शिक्षण संचालक, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड. ता. कागल. जि. कोल्हापूर.

Description

सारांश

प्रस्तुत शोधनिबंधात आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या ताणतणावाच्या समस्येचा आणि तो कमी करण्यासाठी खेळ व शारीरिक क्रियांची भूमिका यांचा अभ्यास करण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा वाढता वापर, शैक्षणिक व व्यावसायिक स्पर्धा, सामाजिक-आर्थिक दबाव यांमुळे सर्व वयोगटांमध्ये ताणतणाव ही गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर खेळ हा केवळ शारीरिक तंदुरुस्तीपुरता मर्यादित न राहता मानसिक, भावनिक व सामाजिक आरोग्य सुधारण्याचे प्रभावी साधन ठरत असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते. आधुनिक क्रीडाक्षेत्रात विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा मानसशास्त्र, पोषणशास्त्र व पुनर्वसन तंत्रांचा वापर केल्यामुळे खेळ अधिक परिणामकारक बनला आहे. नियमित खेळामुळे शरीरातील ताण निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण कमी होऊन आनंददायी हार्मोन्स स्त्रवतात, ज्यामुळे ताणतणाव, चिंता व नैराश्य कमी होते. एकूणच ताणतणावमुक्त आणि आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी खेळाला जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविणे आवश्यक असल्याचे या शोधनिबंधातून अधोरेखित होते.

 

Files

x180132.pdf

Files (611.1 kB)

Name Size Download all
md5:7bc9d466451f0aed2b6dc602d28cac92
611.1 kB Preview Download