Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

21 व्या शतकातील स्त्री सशक्तीकरण चळवळी आणि कायदे

  • 1. सहा.प्राध्यापक, आर्ट्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज, कडेपूर, ता.कडेगाव.,जि.सांगली

Description

सारांश

प्रस्तुत शोधनिबंधात २१ व्या शतकातील स्त्री सशक्तीकरणाच्या चळवळी आणि महिलांसाठी करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण कायद्यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीचा मागोवा घेत आधुनिक काळातील महिलांच्या हक्कांसाठी उभ्या राहिलेल्या सामाजिक, राजकीय व कायदेशीर चळवळींचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. विशाखा चळवळ, #MeToo, Right to Pee, पिंजरा तोड, मंदिर व दर्गा प्रवेश, विधवा सन्मान (हेरवाड पॅटर्न) यांसारख्या चळवळींनी महिलांच्या सन्मान, सुरक्षितता व समानतेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, POSH कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा (२००५), निर्भया कायदा, प्रसूती सुविधा कायदा, नारी शक्ती वंदन अधिनियम (२०२३) यांसारख्या कायद्यांमुळे महिलांचे सामाजिक, आर्थिक व राजकीय स्थान बळकट झाले आहे. मात्र, केवळ कायदे पुरेसे नसून समाजाची मानसिकता बदलणे ही काळाची गरज असल्याचे या अभ्यासातून अधोरेखित होते. एकूणच २१ वे शतक हे स्त्री सशक्तीकरणाच्या दृष्टीने चळवळी आणि कायदे यांचा समन्वय साधणारे परिवर्तनाचे शतक ठरले आहे.

 

Files

x180131.pdf

Files (865.9 kB)

Name Size Download all
md5:5923f9cae8234279f63754db721d7eff
865.9 kB Preview Download