Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

लोकसभा निवडणुकांतील मतदान प्रमाणाचे विश्लेषणात्मक अध्ययन:विशेष संदर्भ- नंदुरबार जिल्हा

  • 1. राज्यशास्त्र विभाग, मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव

Contributors

Description

प्रस्तुत शोध निबंधात भारतीय लोकशाहीतील निवडणूक प्रणालीतील विशिष्ट क्षेत्रातील निवडणूक विषयक विश्लेषणात्मक मांडणी करण्यात आली आहेत. निवडणूक प्रणाली ही लोकशाहीचा कणा मानला जातो. निवडणुकांत बहुमत प्राप्त करणाऱ्या राजकीय पक्षाला सत्ता स्थापन करण्याची संधी दिली जाते. त्यानुसार संबंधित बहुमत प्राप्त करणारा राजकीय पक्ष शासन कारभार करतो. त्यानुसारच संबंधित अध्ययनात विशिष्ट क्षेत्रातील म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील मतदान प्रमाणाचे विश्लेषण केलेले आहेत. आदिवासी-बहुल असलेल्या या जिल्ह्यातील २००९ ते २०२४ या कालावधीतील लोकसभा निवडणुकांच्या मतदान आकडेवारीचे सांख्यिकीय विश्लेषण केले आहे. प्रस्तुत संशोधन अध्ययनकरिता मिश्र पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे, ज्यात तथ्य संकलन करून प्राथमिक व दुय्यम स्वरूपाच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहेत. प्रस्तुत विषयात आदिवासी समुदायातील सामूहिक मतदानाची प्रवृत्ती आणि स्थानिक नेतृत्वाचा निर्णायक प्रभाव दिसून येतो. शिफारशींमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवणे, लिंग-समानता आधारित मोहिमांची आखणी करून अंमलबजावणी करणे, तसेच अलीकडील विज्ञान आणि तंत्रज्ञानशी संबंधित डिजिटल जागरूकता करणे आदी मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Files

1801037.pdf

Files (456.7 kB)

Name Size Download all
md5:58bf2aef5bb9d647bde88cc2f73aefe2
456.7 kB Preview Download