Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

स्त्रीवादी चळवळीत नियतकालिकांचे योगदान

  • 1. आर्ट्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज, कासेगाव

Description

सारांश

स्त्रीवादी चळवळ ही महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय हक्कांसाठी लढणारी एक महत्त्वाची वैचारिक चळवळ आहे. या चळवळीला व्यापक स्वरूप देण्यात स्त्रीवादी नियतकालिकांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांच्या अनुभवांना, प्रश्नांना आणि दडपलेल्या भावना-विचारांना वाचा फोडण्याचे कार्य या नियतकालिकांनी केले. १९७५ नंतर विशेषतः स्त्री प्रश्नांवरील जागृती वाढत गेली आणि त्यातून अनेक स्त्रीवादी नियतकालिके उदयास आली. ‘बायजा’, ‘प्रेरक ललकारी’, ‘मिळून साऱ्याजणी’ आणि ‘स्त्री उवाच’ ही मराठीतील महत्त्वाची स्त्रीवादी नियतकालिके असून त्यांनी स्त्रियांचे हक्क, समानता, स्वातंत्र्य, शिक्षण, रोजगार, आरोग्य, हिंसा आणि सामाजिक विषमता या विषयांवर सातत्याने लेखन व चर्चा घडवून आणली. या नियतकालिकांनी स्त्रियांना स्वतःचे अनुभव मांडण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ दिले तसेच स्त्रीवादी विचार, साहित्य आणि समीक्षेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. स्त्रीवादी नियतकालिकांनी पितृसत्ताक व्यवस्थेतील असमानतेवर प्रहार करत स्त्री-पुरुष समानतेचा विचार समाजात रुजवण्याचे कार्य केले. त्यामुळे स्त्रीवादी चळवळीचा प्रसार झाला आणि स्त्री जीवनाच्या विविध पैलूंवर चिंतन सुरू झाले. म्हणूनच स्त्रीवादी चळवळीचा अभ्यास करताना या नियतकालिकांचे योगदान लक्षात घेणे अपरिहार्य ठरते.

 

Files

x180116.pdf

Files (744.8 kB)

Name Size Download all
md5:f77424eb2e08a513457efaa060a07635
744.8 kB Preview Download