Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाचे बदलते स्वरूप: समाजशास्त्रीय विश्लेषण

  • 1. सहयोगी प्राध्यापक, समाजशास्त्र विभाग, महिला महाविद्यालय, कराड

Description

गोषवारा

प्रस्तुत संशोधन पारंपारिक भारतीय समाजामधील प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर समाजामध्ये जागतिकीकरण, शिक्षणाचे सार्वत्रिकरण, तंत्रज्ञानाचा विकास, स्त्रियांचे सशक्तीकरण, औद्योगिकरण व शहरीकरणाचा परिणाम, विविध समाजमाध्यमांचा प्रसार आणि विविध सामाजिक प्रक्रियांमुळे भारतामधील सामाजिक संस्था, समाजातील वंचित घटकांचा सामाजिक दर्जा, भारतातील शिक्षण व्यवस्था, भारताची आर्थिक संरचना व भारताची संस्कृती या घटकांमध्ये घडून आलेले परिवर्तन अधोरेखित करणारे आहे. प्रस्तुत संशोधन पूर्णतः दुय्यम साहित्यावर आधारित असल्यामुळे संशोधकाने सदर संशोधनासाठी वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा वापर केलेला आहे. संशोधकास उपलब्ध झालेल्या दुय्यम साहित्याच्या अर्थनिर्वचनाच्या आधारे संशोधकाने असा निष्कर्ष मांडला आहे की, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजामध्ये घडून आलेले परिवर्तन भारतीय समाज जीवनाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या महत्वाच्या पैलूंना स्पर्श करणारे आहे. या परिवर्तन प्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये विकास दिसत असला तरी या परिवर्तनाचे नकारात्मक परिणामसुद्धा भारतीय समाजावरझालेले आहेत. थोडक्यात, आधुनिक काळातील भारतीय समाजामधील परिवर्तन विविधांगी, गतिशील, व्यापक, विकासशील आणि काही प्रमाणात विरोधाभासी स्वरूपाचे आहे.

 

Files

x180114.pdf

Files (543.6 kB)

Name Size Download all
md5:38fbe2bdd311c222e9f08fda2ebdee4b
543.6 kB Preview Download