वडार स्त्रीची व्यवसायिक भूमिका आणि आधुनिक समाजासमोरील आव्हाने : विशेष संदर्भ कोल्हापूर शहर
Authors/Creators
- 1. समाजशास्त्र विभाग, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड
Description
गोषवारा :
भारतीय समाज व्यवस्थेच्या जडणघडणीमध्ये काही भटक्या विमुक्त जमाती आहेत. त्यांचे योगदान प्रामुख्याने विचारात घेणे आवश्यक आहे. त्यातील वडार ही एक जमात आहे. ज्यांनी इतिहास व पुरातन काळापासून मानवी संस्कृतीच्या प्रवासात आपल्या अंगभूत श्रम कौशल्याने देशाचा पाया भक्कम केला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वडार जमातीने ऐतिहासिक काळापासून किल्ले बांधणी, तलाव, मंदिरे आणि आधुनिक काळातील धरणे व रस्ते निर्मितीत देखील वडार जमातीचा मोलाचा वाटा आहे. या सर्व श्रमप्रधान प्रक्रियेत वडार स्त्री ही एक केंद्रबिंदू आहे. वडार जमातीतील स्त्री ही केवळ गृहिणी नसून ती एक पूर्ण वेळ उत्पादक श्रमिक आहे. तिचे जीवन दगडाला आकार देण्यापासून पुरुषाच्या बरोबरीला घण मारण्यापर्यंतच्या प्रवास सुरु होऊन घरची चूल पेटवण्याची आणि कौटुंबिक सर्व जबाबदारीही तिला पार पाडावी लागते. मात्र विकासाच्या प्रक्रियेत आणि मुख्य प्रवाहात या कष्टकरी स्त्रीच्या संघर्षाची पुरेशी दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे या शोध निबंधात वडार स्त्रीची व्यावसायिक भूमिका आणि तिच्यासमोरील आव्हाने यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे.
Files
x180112.pdf
Files
(580.2 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:e120ae40268399d51b07f8eb068f1efd
|
580.2 kB | Preview Download |