Published February 28, 2026 | Version v1
Journal article Open

सांस्कृतिक वारसा आणि भारतीय ज्ञानपरंपरा : एक संशोधनात्मक अभ्यास

  • 1. मार्गदर्शक, श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय, पाबळ ता शिरूर जिल्हा पुणे,
  • 2. संशोधक विद्याथिनी, प्रशासक, मविप्र उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय, नाशिक

Contributors

Description

भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि सातत्यपूर्ण संस्कृतींपैकी एक आहे. या संस्कृतीचा पाया भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित असून तिचा प्रभाव सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैज्ञानिक व तत्त्वज्ञानिक क्षेत्रांवर स्पष्टपणे दिसून येतो. भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये वेद, उपनिषद, स्मृती, पुराणे, आयुर्वेद, योग, गणित, खगोलशास्त्र, वास्तुशास्त्र, नाट्यशास्त्र, संगीत, लोकविद्या आणि पर्यावरणीय दृष्टिकोन यांचा समावेश होतो. सांस्कृतिक वारसा हा केवळ भौतिक स्वरूपातील स्मारके व वास्तूंपुरता मर्यादित नसून तो अमूर्त स्वरूपात परंपरा, मूल्ये, भाषा, लोककला आणि जीवनदृष्टी म्हणूनही अस्तित्वात आहे. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये सांस्कृतिक वारसा व भारतीय ज्ञानपरंपरा यांची संकल्पना, ऐतिहासिक विकास, परस्परसंबंध, सामाजिकशैक्षणिक महत्त्व आणि समकालीन उपयुक्तता यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आला आहे. हा अभ्यास आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून करण्यात आला असून आधुनिक शिक्षण व शाश्वत विकासाच्या संदर्भात भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.सा विद्या या विमुक्तये ‘ याचा अर्थ विद्या तीच जी मुक्ती देते हे ब्रीदवाक्य भारतीय ज्ञानपरंपरेचा मूळ आधार राहिले आहे. भारत  हा केवळ भूखंड नसून ती हजारो वर्षापासून प्रवाही असलेली एक महान संस्कृती आहे. भारतीय सांस्कृतिक वारसा हा केवळ वास्तू शिल्प किवा कलापुरता मर्यादित नसून ,तो मानवी जीवनाच्या सर्वागीण विकासाचा एक महत्वाचा भाग आहे.

Files

180247.pdf

Files (432.9 kB)

Name Size Download all
md5:52a51bd5a957d67305254e355f02241e
432.9 kB Preview Download