Published February 28, 2026 | Version v1
Journal article Open

शस्त्र निर्मितीच्या क्षेत्रात विकसित भारताचे योगदान : एक विश्लेषणात्मक अभ्यास

  • 1. गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नगाव,ता.जि.धुळे

Description

प्रस्तुत लेख भारताच्या शस्त्रनिर्मिती क्षेत्रातील वाटचालीचे आणि 'विकसित भारत' संकल्पनेतील त्याच्या योगदानाचे विश्लेषण करतो. आधुनिक राष्ट्रराज्यासाठी संरक्षण क्षमता ही सार्वभौमत्वाची मूलभूत अट असून, भारताने स्वातंत्र्यानंतरच्या परकीय अवलंबनाचा काळ मागे टाकून आता 'आत्मनिर्भरते'कडे पाऊल टाकले आहे. २१ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकानंतर, विशेषतः २०१४ पासून, 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' यांसारख्या धोरणांमुळे संरक्षण उत्पादनात आमूलाग्र बदल झाले आहेत.

भारताने DRDO, HAL आणि BEL यांसारख्या सार्वजनिक संस्थांच्या जोडीला आता टाटा, लार्सन अँड टुब्रो सारख्या खासगी क्षेत्रालाही वाव दिला आहे. यामुळे ब्राह्मोस, अग्नी, तेजस आणि 'स्टार' सारखी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे व विमाने स्वदेशी बनावटीची झाली आहेत. आकडेवारीनुसार, भारताचे संरक्षण उत्पादन २०१३-१४ मधील ४६,४२९ कोटींवरून २०२४-२५ मध्ये १,५०,५९० कोटींपर्यंत पोहोचले आहे. तसेच, भारत आता केवळ आयातदार न राहता एक महत्त्वाचा निर्यातदार देश म्हणूनही उदयास येत असून २०२३-२४ मध्ये २१,०८३ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. तांत्रिक मर्यादा आणि निधीचे अभाव यांसारखी आव्हाने असली तरी, संरक्षण क्षेत्रातील हे स्वावलंबन भारताच्या सामरिक स्वायत्ततेसाठी आणि जागतिक राजकारणातील प्रभावासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Files

180239.pdf

Files (436.9 kB)

Name Size Download all
md5:635415da87185d6c464abd9946225853
436.9 kB Preview Download