भारताचा संरक्षण क्षेत्रातील वाढता खर्च आणि आत्मनिर्भर भारत
Authors/Creators
- 1. सहयोगी प्राध्यापक संरक्षण आणि सामारिक शास्त्र सं.ज.म.शिक्षण संस्थेचे श्री.बापुसो व्ही.सी. चौधरी कला व वाणिज्य महाविद्यालय,खापर ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार
Contributors
Editor:
Description
2025 च्या अखेरीस भारताने जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था टप्पा गाठत जपानला मागे टाकले आहे. भारताचा जीडीपी 4.18 ट्रिलियन डॉलर्सवर पोहचला आहे. भारताचा वर्तमान विकास दर 8.02% इतका असून सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली आहे. 2024-25 मधील संरक्षण बजेट 6,21,940.00 कोटी रुपये इतका आहे. ते एकूण बजेटच्या तुलनेत 2% पेक्षा कमी आहे. जागतिक अर्थव्यवस्था क्रमवारी सध्या अमेरिका, चीन, जर्मनी, भारत, जपान अशी आहे. ‘विकसित भारत- व्हिजन 2047’ या दृष्टीने हि समाधानकारक बाब आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरते साठी निश्चित उद्देश्य आणि कृतीशील वाटचाल आवश्यक आहे. कारण संरक्षण धोरणापुढे विविध आव्हाने आणि मर्यादा आहेत. भारतीय संरक्षण खर्चात दरवर्षी विशिष्ठ प्रमाणात वाढ होत आहे, तथापि हि वाढ काळाच्या दृष्टीकोनातून योग्य प्रमाणात आहे का हे पाहणे जरुरीचे आहे. चीन आणि पाकीस्तान सोबतच तणाव धोरण, अंतर्गत व बहिर्गत स्वरूपातील नवीन नवीन आव्हाने त्याच वेळी संरक्षण क्षेत्रातील आयात कमी करून संरक्षण संशोधन स्थळ-जल-वायुसेनेतील स्वदेशी उत्पादनावर भर देणे गरजेचे आहे. कारण संरक्षणावरचा खर्च हा लोकांच्या आणि प्रसारमाध्यमाचा सातत्याने टीकेचा विषय असतो. अर्थात कारगिल युद्धानंतर भारताने संरक्षण खर्चात वाढ केली त्याचा परिणाम म्हणजे या क्षेत्रात भारत आत्मनिर्भर साध्य करू पाहत आहे.
Files
180232.pdf
Files
(410.0 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:4681e2d3b74ec273c82870af0bf5f57e
|
410.0 kB | Preview Download |