नंदुरबार जिल्हयातील पर्यटनाचा विकास, संधी, समस्या आणि उपाययोजना एक अभ्यास (सारंगखेडा, प्रकाशा, तोरणमाळ)
Authors/Creators
- 1. एस. जे. एम. एस. एम. चे श्री. बापूसाहेब व्हि. सी. चौधरी कला व वाणिज्य महाविद्यालय खापर, जि. नंदुरबार
Contributors
Editor:
Description
महाराष्ट्राच्या उत्तर-पश्चिम भागात वसलेल्या खानदेशात नंदुरबार जिल्हा आहे. १ जुलै १९९८ रोजी नंदुरबार जिल्हयाची निर्मिती झाली. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्हयात भिल्ल, पावरा, कोकणी हया प्रमुख आदिवासी जमाती असून येथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे. तापी ही मुख्य नदी असुन सारंगखेडा व प्रकाशा ही धार्मिक स्थळे तापी नदी किनारी आहेत. तापी नदीवर सारंगखेडा व प्रकाशा येथे मोठे बॅरेज बांधण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हयाच्या उत्तरेला सातपुडाच्या पर्वत रांगा असून हया पर्वत रांगेत तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण आहे. भोगोलिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक व धार्मिक वैशिष्ट्यांमुळे येथे पर्यटनाच्या दृष्टीने मोठी संधी आहे. परंतु पायाभूत सुविधांचा अभाव, प्रचार-प्रसाराच्या मर्यादा इ. बाबींमुळे पर्यटनाचा अपेक्षित विकास झालेला नाही. या शोधनिबंधात सारंगखेडा, प्रकाशा आणि तोरणमाळ येथील पर्यटन विकासाच्या समस्या, संधी व उपाययोजना यांचा अभ्यास करुन पर्यटनाच्या माध्यमातून जिल्हयाचा विकास कसा साधता येईल याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
Files
180228.pdf
Files
(388.3 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:24196e9d1557ddde6b28412bcdf69f28
|
388.3 kB | Preview Download |