Published February 28, 2026 | Version v1
Journal article Open

क्रिकेट खेळातील गोलंदाजी कौशल्य मापनासाठी पदनिश्चय श्रेणी कसोटी ची निर्मिती, वैधता व विश्वसनीयतेचा अभ्यास

  • 1. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रर विद्यापीठ, जळगाव उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, दहिवेल ता. साक्री, जि. धुळे

Contributors

Description

क्रिकेट खेळामध्ये गोलंदाजी ही सामन्याचा निकाल ठरविणारी एक महत्त्वाची कौशल्यात्मक बाब आहे. गोलंदाजी कौशल्याचे अचूक, वस्तुनिष्ठ व शास्त्रीय मापन करण्यासाठी विश्वासार्ह कसोटीची आवश्यकता असते. प्रस्तुत संशोधनामध्ये क्रिकेट खेळातील गोलंदाजी कौशल्य मोजण्यासाठी "पदनिश्चय श्रेणी कसोटी"ची निर्मिती करून तिची वैधता व विश्वसनीयता तपासण्यात आली आहे. या अभ्यासासाठी 14 ते 19 वयोगटातील पुरुष व महिला क्रिकेट खेळाडूंचा नमुना निवडण्यात आला. निरीक्षक आधारित श्रेणी पद्धतीने गोलंदाजी कौशल्याचे मापन करण्यात आले. कसोटीची विषयवैधता तज्ज्ञांच्या मताने निश्चित करण्यात आली असून Test- Retest पद्धतीने विश्वसनीयता तपासण्यात आली. ही कसोटी प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक व संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल.

Files

180222.pdf

Files (420.8 kB)

Name Size Download all
md5:7c1e631f30bf9263b7de2235582bcf8c
420.8 kB Preview Download