Published February 28, 2026 | Version v1
Journal article Open

अस्मितेचा शोध: मराठी आदिवासी कादंबरीतील लोकसंस्कृतीचे चित्रण

  • 1. मराठी विभाग प्रमुख, दादासाहेब दि.शं.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल, ता. एरंडोल जि. जळगाव

Contributors

Description

१९६० नंतर मराठी साहित्यात उदयाला आलेला 'आदिवासी साहित्य प्रवाह' हा या समाजाच्या स्वतंत्र, संघर्षमय आणि समृद्ध लोकसंस्कृतीचा आरसा आहे. प्रस्तुत लेखनात आदिवासी कादंबरीच्या माध्यमातून त्यांच्या निसर्गाधिष्ठित जीवनशैलीचा वेध घेण्यात आला आहे. आदिवासींची संस्कृती ही ‘श्रम, समूह आणि सहकार्य’ या त्रिसूत्रीवर आधारलेली असून, त्यांच्या देवदेवता, श्रद्धा आणि सण-उत्सव निसर्गाशी घट्ट विणलेले आहेत. लेखनामध्ये 'जैत रे जैत', 'झेलझपाट', 'हाकुमी' यांसारख्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांच्या आधारे 'देज' (वधू मूल्य), 'घरघुशी' आणि 'लांबजाना' यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण विवाह प्रथांचे विश्लेषण केले आहे. तसेच 'गोटूल' या संस्कार केंद्राचे महत्त्व आणि नृत्य-गीतांमधून प्रकट होणारी त्यांची सामूहिक ऊर्मी स्पष्ट केली आहे. प्रतिकूल परिस्थिती आणि आर्थिक अभाव असूनही आदिवासी समाजाने आपली मानवी मूल्ये, स्त्रियांचा सन्मान आणि निसर्गाशी असलेले जैविक नाते टिकवून ठेवले आहे. ही जीवनमूल्ये केवळ आदिवासी साहित्याचे वैशिष्ट्य नसून ती संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहेत.

Files

180206.pdf

Files (402.7 kB)

Name Size Download all
md5:370fcfbf82d3f395c7ecaaec9ddb71a8
402.7 kB Preview Download