राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत शिक्षकांची बदलती भूमिका : एक विश्लेषणात्मक अभ्यास
Contributors
Editor:
Description
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे भारतीय शिक्षण व्यवस्थेला विद्यार्थी-केंद्रित, कौशल्याधारित, मूल्याधिष्ठित व सर्वसमावेशक बनवणारे क्रांतिकारी धोरण आहे. या धोरणात शिक्षकाला शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू मानले असून त्यांची भूमिका केवळ ज्ञानदातेपणापुरती मर्यादित न राहता मार्गदर्शक, प्रेरणादाता, नवोन्मेषक आणि समाजपरिवर्तनाचा शिल्पकार अशी व्यापक झाली आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, बहुविद्याशाखीय दृष्टिकोन, मूल्यशिक्षण, भावनिक बुद्धिमत्ता, समावेशक शिक्षण आणि जीवनकौशल्यांचा विकास यावर भर देणे आवश्यक ठरते.तथापि, अभ्यासक्रमातील बदल, डिजिटल साक्षरतेचा अभाव, प्रशासकीय कामांचा बोजा, पालकांचा दबाव, विद्यार्थी विविधता आणि मूल्यांचा ऱ्हास ही शिक्षकांसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी सतत व्यावसायिक प्रशिक्षण, तांत्रिक सुविधा, प्रशासन सुलभीकरण, संशोधन व नवोन्मेषाला प्रोत्साहन, तसेच पालक-समाज-सहभाग यांची गरज आहे.अशा प्रकारे, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची यशस्वी अंमलबजावणी शिक्षकांच्या तयारी, समर्पण आणि सर्जनशीलतेवर अवलंबून असून शिक्षक हेच या धोरणाचा खरा आत्मा व शिल्पकार आहेत.
Files
x180109.pdf
Files
(913.9 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:b1d48b30c0ad4ce74245dc5a477f64b8
|
913.9 kB | Preview Download |