Published February 4, 2026 | Version v1

राष्ट्रीय विकासात मुस्लिम कवितेचे सामाजिक योगदान

  • 1. एस. पी. एच. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नामपूर ता. बागलाण जि. नाशिक

Description

साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यातून समाज मन व्यक्त होत असते. समाजातील चांगल्या वाईट गोष्टींचे चित्रण हे साहित्यातून होत असते. साहित्यिक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. साहित्यिकाने समाजातील घेतलेल्या अनुभवांचा साठा तो आपल्या साहित्यातून व्यक्त करीत असतो. साहित्यिकाने समाजासाठी योगदान द्यावे की नाही असेही प्रश्न मध्यंतरी चर्चीले गेलेत. कलावंताची निर्मिती ही उत्स्फूर्त असली तरी आपल्या समाजाचे भान देखील त्याला ठेवावे लागत असते. कलावंताने आपल्या साहित्यातून सामाजिक योगदान देणेही महत्त्वाचे आहे. अशाच काही उपमुद्यांच्या आधारे मुस्लीम कवितेचे सामाजिक योगदानाविषयी या शोधनिबंधामध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक साहित्यप्रकार हा त्या त्या काळाच अपत्य असते. कारण ज्या त्या साहित्यप्रकारावरून त्या त्या काळाची भाषा कळत असते.  मुस्लीम कवितेतील सामाजिक बांधिलकी, मुस्लीम कवितेतील समता, राष्ट्रीय एकात्मता, बंधूता इत्यादी उपमुद्यांच्या आधारे मुस्लीम मराठी  कवितेचे राष्ट्रीय विकासात सामाजिक योगदानाविषयी विचार सदर शोधनिबंधामध्ये करणार आहोत.

 

 

Files

070830.pdf

Files (581.6 kB)

Name Size
md5:154e41247c4c8c4ba1e201aa5eabdcad
581.6 kB Preview Download