भारतीय पर्यटन आणि सामाजिक विकास
Authors/Creators
- 1. समाजशास्त्र विभाग श्री शिवाजी महाविद्यालय परभणी
Contributors
Editor:
Description
भारतीय पर्यटन उद्योग आणि सामाजिक विकास हे परस्पर संबंधित आहेत. पर्यटनामुळे नवनवीन रोजगार संधी निर्माण होतात, स्थानिक संस्कृती आणि जीवनशैलीला जागतिक ओळख मिळते, तसेच पर्यावरणीय आणि सांस्कृतिक संवर्धन होण्याची शक्यता निर्माण होते. पर्यटन हे भारताच्या समाजाचा एक महत्त्वाचा घटक बनले आहे. यामुळे सरकारने विविध धोरणे आणि योजना राबवली आहेत ज्यामुळे पर्यटन उद्योगाची वृद्धी झाली आहे आणि समाजात जागरूकता निर्माण झाली आहे. या संशोधन लेखामध्ये भारतीय पर्यटनाचा सामाजिक विकासावर होणारा प्रभाव, सांस्कृतिक संवर्धनातील त्याची भूमिका, सामाजिक एकात्मता, पायाभूत सुविधांचा विकास तसेच पर्यटनामुळे निर्माण होणाऱ्या संधी व आव्हानांचा अभ्यास करण्यात आला आहे. पर्यटनामुळे लोककला, हस्तकला, सण-उत्सव आणि परंपरांचे जतन होते तसेच विविध संस्कृतींमधील आदान-प्रदान वाढून सहिष्णुता व राष्ट्रीय एकात्मता बळकट होते. तथापि, अति-पर्यटनामुळे पर्यावरणीय ऱ्हास व सामाजिक असमतोल निर्माण होण्याची शक्यता असल्याने शाश्वत पर्यटन विकासाची आवश्यकता अधोरेखित होते. योग्य नियोजन, स्थानिक सहभाग आणि शाश्वत धोरणांच्या माध्यमातून पर्यटनाचा वापर केल्यास भारतीय समाजाचा सर्वांगीण व दीर्घकालीन सामाजिक विकास साध्य होऊ शकतो.
Files
180138 .pdf
Files
(592.2 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:aed95e892498fbb5a72fa0a1204cc507
|
592.2 kB | Preview Download |