Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

परभणी जिल्ह्यातील हतनूर येथील श्री नागनाथ मंदिर स्थापत्याचा पर्यटनाच्या दृष्टीने अभ्यास

  • 1. संशोधक विद्यार्थी

Contributors

Description

महाराष्ट्र राज्याला समृद्ध धार्मिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेली असून परभणी जिल्ह्यातील हतनूर येथील श्री नागनाथ मंदिर हे त्याचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. सदर मंदिर चालुक्य–यादव काळातील भुमिज शैलीतील असून काळ्या पाषाणातील त्रिदल पद्धतीची रचना, गर्भगृह, उपगर्भगृह, मुखमंडप, सभामंडप, शिखर व बारव ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडण्याची रचना ही स्थापत्यकलेची अद्वितीय वैशिष्ट्य ठरते. मंदिराशी संबंधित धार्मिक उत्सव, पालखी सोहळा, दीपोत्सव व श्रावण महिन्यातील उपक्रम यांमुळे हे स्थळ भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. स्थापत्य, ऐतिहासिक व धार्मिक मूल्यांमुळे श्री नागनाथ मंदिर धार्मिक, ऐतिहासिक व स्थापत्य पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते तसेच स्थानिक आर्थिक व सामाजिक विकासास चालना देते. त्यामुळे हतनूर येथील श्री नागनाथ मंदिर हे पर्यटन विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण वारसास्थळ आहे.

Files

180124.pdf

Files (452.2 kB)

Name Size Download all
md5:99cd7b24ce738fc19050f5ab6067253c
452.2 kB Preview Download