भारतीय पर्यटन आणि संगीत महोत्सव
Contributors
Editor:
Description
एकविसावे शतक हे पर्यटनाचे शतक म्हणून ओळखले जाते. पर्यटन केवळ विरंगुळ्याचे साधन न राहता सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनले आहे. भारतीय पर्यटन क्षेत्रात सांस्कृतिक वारसा, कला, संगीत व उत्सव यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय संगीत महोत्सव हे पर्यटन व सांस्कृतिक चळवळीचे महत्त्वाचे अंग असून त्यातून शास्त्रीय संगीत, लोकसंगीत व नृत्यकला यांचे संवर्धन होते. वेरूळ–अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव, सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, बाणगंगा महोत्सव व दत्तजयंती संगीत महोत्सव हे महाराष्ट्रातील प्रमुख संगीत महोत्सव पर्यटनाला चालना देणारे आहेत. या महोत्सवांमुळे ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे महत्त्व अधोरेखित होऊन देशी-विदेशी पर्यटक आकर्षित होतात. संगीत महोत्सवांद्वारे सांस्कृतिक ओळख बळकट होते, नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळते तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळते. त्यामुळे भारतीय पर्यटन व संगीत महोत्सव यांचा परस्परपूरक संबंध असून तो सांस्कृतिक जतन व पर्यटन विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.
Files
180122.pdf
Files
(659.7 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:5d20d17d40a5899d55324ff906928e74
|
659.7 kB | Preview Download |