Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

मराठी आदिवासी साहित्याचे बदलते आयाम

  • 1. प्राध्यापक, मराठी विभाग श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी

Contributors

Description

मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आदिवासी साहित्याने अलीकडील काळात स्वतंत्र व सशक्त ओळख निर्माण केली आहे. दीर्घकाळ उपेक्षित राहिलेल्या आदिवासी समाजाच्या जीवनानुभवांचे, वेदनांचे व संघर्षांचे प्रामाणिक चित्रण या साहित्यात आढळते. प्रारंभी हे साहित्य शोषण, दारिद्र्य, विस्थापन व अन्याय यांवर केंद्रित होते; मात्र कालांतराने त्यात अस्मितेचा शोध, सांस्कृतिक स्वाभिमान, स्त्रीवादी जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि राजकीय भान हे नवे आयाम विकसित झाले. निसर्गाशी असलेले अतूट नाते, लोकभाषेचा वापर, सामूहिक जीवनदृष्टी आणि अनुभवाधारित लेखन ही मराठी आदिवासी साहित्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. आज कविता, कथा, कादंबरी, आत्मकथन अशा विविध साहित्यप्रकारांतून आदिवासी लेखन विस्तारत असून, सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणून ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Files

1801119 .pdf

Files (555.4 kB)

Name Size Download all
md5:9a397d8417a315a275bef6df706c721c
555.4 kB Preview Download