20१४ नंतर भारताच्या परराष्ट्र धोरणातील बदल एक अभ्यास
Authors/Creators
- 1. प्राध्यापक, सैनिकशास्त्र विभाग, श्री शिवाजी महाविद्यालय, वसमत रोड परभणी
Contributors
Editor:
Description
हा शोधनिबंध २०१४ नंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांचा अभ्यास करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या परराष्ट्र धोरणात ‘राष्ट्रहित’, ‘आत्मनिर्भरता’ आणि ‘रणनीतिक स्वायत्तता’ या संकल्पनांना केंद्रस्थानी ठेवून अधिक सक्रिय, आक्रमक व व्यवहार्य दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे. पारंपरिक अलिप्ततावादी धोरणातून बाहेर पडून भारताने बहु-ध्रुवीय जागतिक व्यवस्थेशी जुळवून घेत विविध आंतरराष्ट्रीय गटांशी (QUAD, BRICS, G20) विषयानुरूप सहकार्य वाढवले आहे. ‘Neighbourhood First’, ‘Act East’, ‘SAGAR’ धोरणांद्वारे शेजारी देशांशी, आशिया-पॅसिफिक क्षेत्राशी तसेच हिंदी महासागर क्षेत्राशी संबंध दृढ करण्यात आले. दहशतवादविरोधी कणखर भूमिका, आर्थिक मुत्सद्देगिरी, सौम्य शक्तीचा (योग, आयुर्वेद, संस्कृती) वापर आणि जागतिक नेतृत्वाची आकांक्षा ही या धोरणाची वैशिष्ट्ये ठरतात. एकूणच, २०१४ नंतर भारताचे परराष्ट्र धोरण अधिक आत्मविश्वासपूर्ण, वास्तववादी व जागतिक स्तरावर प्रभावी झाले असून भारताच्या महाशक्ती म्हणून उदयाची दिशा स्पष्ट होते.
Files
1801107 .pdf
Files
(777.9 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:ff54c92c574c827bd378a0b1328ac873
|
777.9 kB | Preview Download |