Published January 31, 2026 | Version v1
Journal article Open

भारतीय संविधान व मानवी हक्क

  • 1. (राज्यशास्त्र विभाग प्रमुख) पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव

Contributors

Description

या लेखात भारतीय संविधान आणि मानवी हक्क यांचा सविस्तर व चिकित्सक आढावा घेण्यात आला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शासनाकडून समानता, न्याय आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण अपेक्षित होते; मात्र सध्याच्या राजकीय-आर्थिक वास्तवात शासनाची भूमिका जनहिताऐवजी विशिष्ट वर्चस्वशाली व भांडवली वर्गाभिमुख होत असल्याचे चित्र दिसते. विकासाच्या नावाखाली वाढती असमानता, बेरोजगारी, विस्थापन, ग्रामीण-शहरी दरी आणि दुर्बल घटकांचे शोषण यामुळे मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, स्वतंत्र न्यायपालिका आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोग या संस्थात्मक यंत्रणांद्वारे मानवी हक्कांचे संरक्षण कसे केले जाते, याचे विश्लेषण लेखात करण्यात आले आहे. न्यायपालिकेने हक्कांचे व्यापक अर्थ लावून सामाजिक-आर्थिक अधिकारांना बळ दिले असले, तरी मार्गदर्शक तत्त्वांची अपुरी अंमलबजावणी, भ्रष्टाचार व धोरणात्मक अपयश यांमुळे अपेक्षित समता व न्याय साध्य झालेले नाहीत. त्यामुळे मानवी हक्कांचे प्रभावी संरक्षण आणि संविधानिक मूल्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे ही आजची मोठी गरज असल्याचे लेख अधोरेखित करतो.

Files

1801101.pdf

Files (593.1 kB)

Name Size Download all
md5:5e23208f0ad2553110e26eaf76d5139b
593.1 kB Preview Download