भारतीय निर्वाचन आयोग आणि निवडणूक सुधारणा (Election Commission and Election Reforms)
Authors/Creators
- 1. सहयोगी प्राध्यापक व संशोधन मार्गदर्शक, राज्यशास्त्र विभागप्रमुख श्री. योगानंद स्वामी महाविद्यालय, वसमत जि. नांदेड
Contributors
Editor:
Description
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून, निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नागरिकांना निर्भीडपणे मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि घटनात्मक दर्जा असलेला भारतीय निर्वाचन आयोग स्थापन केला आहे. या संशोधन लेखात भारतीय लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया, निर्वाचन आयोगाची रचना, अधिकार व कार्ये तसेच निवडणूक सुधारणांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीनुसार निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध सुधारणा राबविण्यात आल्या आहेत. प्रचार कालावधीतील बदल, अनामत रकमेत वाढ, सूचक-अनुमोदकांच्या संख्येत वाढ, उमेदवारांच्या अपात्रतेच्या अटी, निवडणूक खर्चाची मर्यादा, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रचार, उमेदवारांच्या संपत्ती व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जाहीर प्रकटीकरण यांसारख्या सुधारणांनी निवडणूक व्यवस्थेत शिस्त आणि विश्वासार्हता निर्माण केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालय व निर्वाचन आयोग यांच्या हस्तक्षेपामुळे लोकशाही मूल्यांचे संरक्षण झाले आहे. निष्कर्षतः भारतीय निर्वाचन आयोगाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य निवडणूक सुधारणा घडवून आणून भारतीय लोकशाही अधिक सशक्त, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
Files
180110.pdf
Files
(736.8 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:cc4d729c31525cc29142be03750406e5
|
736.8 kB | Preview Download |