भारताच्या राजकीय क्षेत्रात इंदिरा गांधीचे योगदान
Authors/Creators
- 1. संशोधक विद्यार्थी, स्व. आण्णासाहेब आर.डी. देवरे कला, व विज्ञान महाविद्यालय म्हसदी, ता. साक्री जि. धुळे
- 2. संशोधक मार्गदर्शक, राज्यशास्त्र विभाग, स्व. आण्णासाहेब आर.डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय म्हसदी, ता. साक्री जि. धुळे
Contributors
Editor:
Description
स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय इतिहासात इंदिरा गांधी यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी ठरले आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी धाडसी निर्णय, मजबूत नेतृत्व व केंद्रीकृत सत्तेच्या माध्यमातून भारतीय राजकारणाला नवी दिशा दिली. बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे विशेषाधिकार रद्द करणे, ‘गरीबी हटाव’ धोरण, हरित क्रांतीला प्रोत्साहन, १९७१ च्या युद्धातील निर्णायक नेतृत्वातून बांगलादेशाची निर्मिती तसेच परराष्ट्र धोरणातील सक्रियता ही त्यांच्या कार्याची ठळक उदाहरणे आहेत. तथापि, १९७५–७७ च्या आणिबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांवर मर्यादा आल्याने त्यांच्या नेतृत्वावर टीकाही झाली. या संशोधन लेखात इंदिरा गांधी यांच्या राजकीय नेतृत्वाचा सर्वांगिण आढावा घेऊन त्यांच्या धोरणांचे भारतीय लोकशाही, संघराज्य व्यवस्था व आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर झालेले सकारात्मक व नकारात्मक परिणाम तटस्थपणे विश्लेषित करण्यात आले आहेत.
Files
180221.pdf
Files
(500.7 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:0f42efc56184f1f0e7a0e929cf734910
|
500.7 kB | Preview Download |