भारताची वाढती लोकसंख्या आणि विकासातील वास्तव
Contributors
Editor:
Description
या लेखात भारताच्या वाढत्या लोकसंख्येचा विकासाशी असलेला परस्परसंबंध स्पष्ट करण्यात आला आहे. 1951 पासूनच्या पंचवार्षिक योजनांमध्ये लोकसंख्येला विकासाचा महत्त्वाचा घटक मानले गेले असून, लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजनावर भर देण्यात आला आहे. भारतातील लोकसंख्या वाढीचा इतिहास, जनगणनेची आकडेवारी तसेच महाराष्ट्रातील लोकसंख्येची स्थिती यांचे विश्लेषण लेखात केले आहे. शिक्षणातील वाढ, महिलांचे करिअरकडे लक्ष, वाढता जीवनखर्च, आरोग्य व शिक्षणावरील खर्च, कुटुंब नियोजनाची जागरूकता आणि गर्भनिरोधकांची उपलब्धता यांमुळे भारताचा एकूण प्रजनन दर लक्षणीयरीत्या घटत असल्याचे नमूद केले आहे. या घटत्या प्रजनन दरामुळे आर्थिक विकासाला चालना मिळत असली तरी भविष्यात वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण वाढणे व कार्यक्षम कामगार वर्ग कमी होणे ही आव्हाने निर्माण होऊ शकतात. जागतिक लोकसंख्या दिनाची संकल्पना, 2025 ची थीम आणि शाश्वत विकास उद्दिष्टांशी लोकसंख्येचा असलेला संबंध अधोरेखित करत, संतुलित लोकसंख्या धोरण आणि सामाजिक सुरक्षेच्या नियोजनाची गरज लेखात मांडली आहे.
Files
x171220.pdf
Files
(812.6 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:7cfa08a07d637cd571a5a38f5c03147f
|
812.6 kB | Preview Download |