Published September 30, 2025 | Version v1

ए. आय.: काल, आज आणि उद्या – मानवतेसाठी

  • 1. इतिहास विभाग प्रमुख आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय, कडा ता. आष्टी, जि.बीड

Contributors

Description

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) हे तंत्रज्ञान २१व्या शतकातील सर्वात वेगाने विकसित होणारे आणि परिवर्तन घडवणारे साधन म्हणून उदयास आले आहे. प्रस्तुत शोधनिबंधात ए.आय.चा इतिहास, सध्यस्थिती आणि भावी दिशा या तीन टप्प्यांचा आढावा घेतला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीत Alan Turing यांचे सैद्धांतिक योगदान, 1956 च्या डार्टमथ परिषदेत मांडलेली ए.आय.ची संकल्पना आणि AI Boom ते AI Winter यांचा विकास प्रवास स्पष्ट करण्यात आला आहे. आजच्या काळात मशीन लर्निंग, डीप लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन, नैसर्गिक भाषा प्रक्रिया यांसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ए.आय. वैद्यक, शिक्षण, शेती, उद्योग, सुरक्षा आणि दैनंदिन जीवनात व्यापकपणे वापरले जात आहे. भविष्यातील "General AI", पूर्ण स्वयंचलित वाहतूक व्यवस्था, AI Mentor आधारित शिक्षण, पर्यावरण संरक्षणातील ए.आय.चा वापर, आरोग्यसेवा सुधारणा आणि अंतराळ संशोधनातील भूमिकेविषयीही या लेखात विवेचन केले आहे. ए.आय.मुळे निर्माण होणाऱ्या नैतिक, सामाजिक आणि गोपनीयतेसंबंधित आव्हानांचा आढावा घेऊन मानवकेंद्रित आणि जबाबदार ए.आय.विकासाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. एकूणच, ए.आय. मानवतेच्या प्रगतीचा भविष्यातील मार्ग ठरवणारे परिवर्तनकारी साधन ठरणार आहे, यावर हा निबंध प्रकाश टाकतो.

Files

170929.pdf

Files (1.2 MB)

Name Size Download all
md5:e54d9bec681bcd90776b8ea0260e4193
1.2 MB Preview Download