मराठी भाषा, संस्कृती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)
Authors/Creators
- 1. (मराठी विभाग) भगवान महाविद्यालय, आष्टी ता.आष्टी जि.बीड
Contributors
Editor:
Description
"मराठी भाषा, संस्कृती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)" या संशोधन लेखामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि परंपरागत सांस्कृतिक घटक यांमधील परस्परसंबंधांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे तंत्रज्ञान मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी, लोककला व साहित्याच्या तथा संस्कृतीच्या डिजिटायझेशनसाठी, तसेच शिक्षण, आरोग्य, शेती व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रांत नवे मार्ग उघडते आहे. डिजिटल माध्यमांतून स्थानिक भाषेत माहिती पोहोचवून तंत्रज्ञानाचा लोकाभिमुख वापर शक्य झाला आहे.मात्र, या तंत्रज्ञानाचा अतिरेकी व असंवेदनशील वापर झाल्यास मराठी भाषा आणि संस्कृतीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. बोलीभाषांचे लोप, परंपरागत ज्ञानाचे विस्मरण, स्थानिक रोजगारांचा ऱ्हास, सांस्कृतिक अप्रामाणिकता आणि सर्जनशीलतेचा लोप ही संभाव्य आव्हाने आहेत.
या लेखात AI च्या फायद्यांसोबतच मराठी भाषेच्या संदर्भातील धोके अधोरेखित करून, धोरणात्मक उपाययोजना व संवेदनशील दृष्टीकोनाची गरज स्पष्ट केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करताना सांस्कृतिक मूल्यांची जपणूक आणि भाषिक विविधतेचे जतन ही काळाची गरज आहे. ही भूमिका या संशोधन लेखाच्या माध्यमातून अधोरेखीत केली आहे.
Files
170921.pdf
Files
(812.4 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:b151866d33b7f2cf5d4bfae1fb9bdf42
|
812.4 kB | Preview Download |