Published September 30, 2025 | Version v1

दिनेश काळे यांच्या 'मनाची अभिलाषा' या महानगरीय कथासंग्रहातील स्त्रीप्रतिमा: एक समीक्षात्मक अभ्यास

  • 1. संशोधक विद्यार्थी, आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय, कडा ता. आष्टी जि. बीड डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
  • 2. संशोधन मार्गदर्शक, मराठी विभाग प्रमुख एस. के. गांधी महाविद्यालय, कडा ता. आष्टी जि. बीड

Contributors

Description

मराठी कथासाहित्यात १९८० नंतरचा काळ हा सामाजिक बदल, औद्योगिकीकरण, महानगरी संस्कृती आणि नातेसंबंधांच्या नव्या व्याखांचा काळ होता. ग्रामीण भागातून शहरांकडे झालेल्या स्थलांतरामुळे जीवनाची गती वाढली, नाती व्यवहारप्रधान झाली आणि स्त्रीच्या भूमिकेत आमूलाग्र परिवर्तन घडले. शिक्षण, नोकरी आणि आर्थिक स्वावलंबनामुळे स्त्री बाह्य जगात सक्रिय झाली; परंतु तिच्या मनातील भावनिक ओलावा, संवेदनशीलता आणि कर्तव्याची जाणीव अजूनही टिकून राहिली. या संक्रमणाच्या काळाचं वास्तववादी आणि संवेदनशील चित्रण दिनेश काळे यांच्या ‘मनाची अभिलाषा’ या कथासंग्रहात दिसतं. त्यांच्या कथांमधील स्त्रिया पारंपरिकतेच्या बंधनातून बाहेर पडलेल्या आहेत, पण त्याच वेळी त्या जबाबदार, विवेकनिष्ठ आणि आत्मभान असलेल्या आहेत. या संशोधन लेखात त्या सर्व स्त्रीप्रतिमांचं सविस्तर विश्लेषण करण्यात आलं आहे, ज्यातून महानगरी स्त्रीच्या आत्मशोधाचा आणि जीवनदृष्टीतील प्रगल्भतेचा आलेख स्पष्ट होतो.

Files

170902...pdf

Files (585.6 kB)

Name Size Download all
md5:c075e4e0d3a2311616cea44040e7e988
585.6 kB Preview Download