Published November 30, 2025 | Version v1

शाहादा तालुक्यातील पावरा आदिवासी जमातीचा ग्रामपंचायतीच्या प्रशासनातील सहभाग

  • 1. राज्यशास्त्र विभाग, श्रीमती.पा.बा.बागल कला व वाणिज्य महाविद्यालय दोंडाईचा, ता–शिंदखेडा, जि–धुळे.
  • 2. राज्यशास्त्र विभाग प्रमुख, कला,विज्ञान आणि पी ओ नाहटा, वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ ता.भुसावळ, जि.जळगाव

Contributors

Description

शाहादा तालुक्यातील पावरा आदिवासी जमातीचा सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय सहभाग हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विशेषत्वाने दृश्यमान होतो. आदिवासी समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमातीची मुळे निसर्गाशी जोडलेली असून त्यांची जीवनशैली, परंपरा, रूढी, अर्थव्यवस्था व प्रशासनातील सहभाग यांमध्ये त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतिबिंब दिसते. पावरा जमात नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमातींपैकी एक असून सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी विविध पाड्यांवर विखुरलेली आहे. स्वातंत्र्यानंतर या जमातीने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला असून ग्रामीण समस्यांच्या निराकरणासाठी, स्थानिक विकासासाठी आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत ही प्रमुख संस्था म्हणून कार्यरत आहे. सांस्कृतिक वारसा, एकजिनसी सामाजिक रचना, स्थानिक नेतृत्व, ग्रामसभा व ग्रामपंचायत या माध्यमातून पावरा जमातीचे लोक लोकशाही प्रक्रियेचा अंगीकार करून प्रशासनात महत्वाची भूमिका बजावतात. प्रस्तुत अभ्यासातून असे दिसते की पावरा जमात स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे आपली राजकीय जागृती, निर्णयक्षम सहभाग आणि ग्रामीण विकास प्रक्रिया मजबूत करण्यासाठी प्रभावी योगदान देत आली आहे.

 

Files

x171110....pdf

Files (667.1 kB)

Name Size Download all
md5:16ba2186310529c5e46f6551d72c37a5
667.1 kB Preview Download